[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

गारपीट ग्रस्त वाकी खुर्द, वाकी बु” व परिसरातील शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

गारपीट ग्रस्त वाकी खुर्द, वाकी बु” व परिसरातील शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा.

रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द, वाकी बु” व परिसरातील अनेक गावात गारपीट व अवकाळी अतिवृष्टी झाली.यामुळे काढणीस आलेला कांदा पिक व द्राक्ष बागा यांचे 100% नुकसान झाले आहे.सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब नाशिक व आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांचेसह तालुका कृषी अधिकारी व महसूल विभागातील सर्व अधिकारी वर्ग यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे.
आजवरचा शेतकरी वर्गाचा अनुभव पाहता शासन फक्त पंचनामे करून पॅकेज जाहीर करते.परंतु वर्ष वर्ष शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेवर भेटत नाही.जे अनुदान प्राप्त होते ते देखील नुकसानीच्या दृष्टीने अतिशय अत्यल्प असते.यामुळे वाकी खुर्दचे माजी सरपंच विक्रम जगताप यांनी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्रित करून आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मे.तहसीलदार साहेब चांदवड यांना सुमारे 100 शेकऱ्यांच्या सह्या असलेले लेखी स्वरूपात निवेदन देऊन नुकसान भरपाई तात्काळ घोषित करण्याची मागणी केली आहे.यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पिकासाठी एकरी तीन लाख रु.कांदा पिकासाठी एकरी दिड लाख रु.आणि हरभरा व इतर रब्बी पिकांकरिता एकरी 60 हजार रु.नुकसान भरपाई मिळण्याची मागणे शासनाने द्यावी अश्या मागण्या केल्या आहे.वरील सर्व मागण्या दिनांक 4 डिसेंबर पर्यंत जाहीर न झाल्यास,चांदवड तहसीलदार साहेब यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.संबधीत निवेदनाची प्रत मा.जिल्हाधिकारी साहेब व पालकमंत्री साहेब यांना देखील पाठविली आहे.
या प्रसंगी दादा कोकणे,संतोष जगताप,मछिंद्र कोकणे,गोरख कोकणे,शांताराम कवडे,आण्णा कवडे,प्रमोद सोनावणे,सुकदेव वाकचौरे,साहेबराव वाकचौरे,माणिक सोनावणे,शिवाजी देवढे,
शिवराम आरोटे,सोमनाथ आरोटे,केशव आरोटे,आण्णा गांजे,शांतराम जाधव,भावराव शेलार यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या