[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वागदर्डी येथे बालविवाह निर्मूलनाचे पद नाट्य व जनजागरण रॅलीचे आयोजन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

वागदर्डी येथे बालविवाह निर्मूलनाचे पद नाट्य व जनजागरण रॅलीचे आयोजन

वागदर्डी येथील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने युनिसेफ एन एस बी सी 3च्या माध्यमातून शिवतीर्थ सेवाभावी संस्थेच्या आयोजनातून बालविवाह निर्मूलनाचे पद नाट्य व जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती विद्यालयाच्या सचिव सौ उज्वला जैन प्रमुख पाहुणे युनिसेफच्या बालसंरक्षणा आधिकारी पूनम काशप्पे शिवतीर्थ बहुउद्देशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वाल्मीक उराडे मुख्याध्यापक संतोष भराडे योगेश कुमावत सोनाली बच्छाव मॅडम गांगुर्डे सर यावेळी पूनम काश्यप यांनी मार्गदर्शन त्याप्रसंगी त्या बोलल्या की आज ग्रामीण भागात मुला-मुली चे शिक्षणाची छान व्यवस्था जैन कुटुंबाने केल्याचे कौतुक केले मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे मुलगी म्हणजे दुसऱ्याचे धन तिला शिकून काय करायचे अशी मानसिकता आजही बघायला मिळते पुढील शिक्षणाला फी भरण्यासाठी पैशांची तारांबळ गावाकडून शहराकडे जाण्यासाठी बसची आजही व्यवस्था नाही बालविवाह बेकायदा असला तरी अनेक पालक आपल्या मुला मुलींचे बालविवाह करून पाहत आहेत अनेकदा वर्तमानपत्रातून वाचत असतो पण कारवाई होत असूनही बालविवाह मात्र थांबलेले नाही हे शोकांतिका आहेत अशा बालविवाह मूळ बालकांचे शिक्षण आरोग्य खेळण्याचे वय हिरावून घेतले जाते आशा परिस्थिती मुलींनी शिक्षण घेणे गरजेचे आहे आणि आपल्या आई-वडिलांना मुला मुलींनी बालविवाह कायद्याने गुन्हा आहे हे समजून सागणे ही काळाजी गरज आहे


बच्छाव मॅडमयांनी आपले मनोगत सागितलं बाल विवाहाचे दुष्परिणाम लहान वयात लाद लेल्या गरोदरपणामुळे प्रस्तुती च्या वेळी कायमचे अपंगत्व येऊ शकते आणि कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते माता मृत्यूचे प्रमाण वाढते विद्यार्थ्यांनी पद नाट्य आणि गावा मध्ये जनजागृती रॅली त सांगू ठणकावून पुन्हा पुन्हा बाल विवाहा आहेत कायद्याने गुन्हा बालविवाह कसा घातक आहे हा संदेश दिला यावेळी उपस्थित नामदेव वाजे सोमनाथ पगार ज्ञानेश्वर पगार समाधान एडाईत संजय गागरे रतीलाल चौधरी अजेय निफाडकर कऱ्हे सर सतिश पगार गणेश उराडे मीना लोहार सुनिता उराडे मीना झाल्टे ज्योती झाल्टे मंदाबाई बोरसे सागर वाजे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या