[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडनेरभैरव येथे दत्त जयंती उत्सवात एक पणती मुलीसाठी एक दिवा देशासाठी हा उपक्रम संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

वडनेरभैरव येथे दत्त जयंती उत्सवात एक पणती मुलीसाठी एक दिवा देशासाठी हा उपक्रम संपन्न

भारत देशातील प्रत्येक नागरिकांनी देवधर्म आणि सामाजिक काम करीत असतानाच देशभक्तीसाठी सुद्धा विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे देव धर्मा इतकाच देश देखील महत्त्वाचा आहे असे मत नाशिक लोकसभा भाजपा अध्यक्ष केदानाना आहेर यांनी वडनेर भैरव येथे व्यक्त केले ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे होते
वडनेर भैरव येथे दत्त जयंती उत्सवात एक पणती मुलीसाठी एक दिवा देशासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
वडनेर भैरव सलादे बाबा दत्त मंदिर येथे सलग 62 व्या वर्षी दत्त जयंती उत्सवाचे आयोजन वडनेर भैरव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलेले होते
सलादे बाबा दत्त मंदिर येथे दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने दत्त घटस्थापना श्री दत्ता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली तर चांदवड तालुक्यातील पहिले महिला गुरुचरित्र पारायण सलग बाराव्या वर्षी महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले या गुरुचरित्र पारायणाची नेतृत्व स्वामी समर्थ भक्त सौ वैशाली दत्तात्रय आहेर यांनी केले.
छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील दत्तकथाकार विठ्ठल महाराज राठोड यांची दत्तकथा आयोजित केली होती
आयोजकांच्या वतीने धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि देशभक्तीपर कार्य म्हणून 2000 प्रज्वलित करून एक पणती कन्येसाठी एक दिवा सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन भाजपाने ते केला आहे व चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते करण्यात आला
दत्त मंदिर परिसरात श्रीराम चौक ते संत गाडगेबाबा चौक यादरम्यान सुमारे 2015 यावेळी प्रज्वलित करून संदेश देण्यात आला
दत्त जन्मोत्सवाच्या वेळी सलाम 28 वर्ष दत्त जयंती चे महापूजा करण्याचे विक्रम श्री गौतम बापू पाटील यांनी केला आहे त्यांच्या हस्ते आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार राहुल आहेर चांदवड मार्केट कमिटीचे संचालक व माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुंभार्डे शिवसेना जिल्हा अध्यक्ष नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष योगेश साळुंखे, चांदवड तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शांताराम भवर बाळासाहेब हे यावेळी उपस्थित होते.
आयोजकांच्या वतीने देणगीदार आणि दत्तकथा प्रायोजक या सर्वांचा सन्मान ट्रस्ट अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे, सचिव राहुल पाचोरकर, सल्लागार एडवोकेट पोपटराव पवार वडनेर भैरव परिसर दत्त जयंती उत्सव समिती अध्यक्ष श्री एन. डी दादा माळी दीक्षा भाऊसाहेब भालेराव सचिव दत्ता शिंदे या सर्वांच्या हस्ते करण्यात आला
. गुरुचरित्र पारायण औदुंबर पूजन दत्त अभिषेक शांतीपाठ झाल्यानंतर दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला
यावेळी दत्त मूर्तीचे पूजन गौतम बापू पाटील आणि ऋषी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश सलादे कुमारी नंदिनी पवार आणि लक्ष्मण सलादे यांनी केले.यावेळी सरपंच सुनील मामा पाचोरकर, अमोल भालेराव.रावसाहेब भालेराव,बापू पाचोरकर डॉ.विक्रम सला दे,सोपान वक्ते.आदी उपस्थि त होते.
विक्रम यशस्वीतेसाठी सलादे बाबा कला क्रीडा मंडळ, वडनेर भैरव परिसर दत्त जयंती उत्सव समिती, राजमुद्रा ग्रूप यांनी परिश्रम घेतले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या