मनमाड महाविद्यालया तर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे शिंगवे येथे समारोप
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलीत, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे १२५ स्वयंसेवकांकडून शिंगवे (मतोबा) येथे श्रमदान व युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती करून समारोप संपन्न झाले. या समारोपप्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्या श्रीमती अलकाताई शिंदे, श्री. शांतीलाल गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. राजेंद्र गांगुर्डे ,जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मा.संजय गवळी यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले. या सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये विशेष श्रमदान केलेल्या स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला.
या शिबिरादरम्यान शालेय, मंदिर, स्मशानभूमी तसेच पोलीस चौकी परिसरांची स्वच्छता, शोषखड्डे, मतोबा टेकडीवर सी.सी.टी. चर, दत्तक गावाचा इतिहासचा अभ्यास व सर्वेक्षण, ग्रामविकास सर्वेक्षण, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांचे वाचन व प्रसार माध्यमे वरील व्याख्यान, डॉ. संतोष पगार यांचे राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक यावरील मार्गदर्शन, निमगाव महाविद्यालयाचे रासेयो स्वयंसेवकासोबत सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरा दरम्यान रोज सकाळी येवला येथील डॉ. नीताताई पटेल व संगीता पटेल यांचे हृदयानुभूती ध्यान सत्र, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने स्वयंसेवकांनी गडकिल्ले बनवुन गडकिल्ले संवर्धनाचे महत्त्व समजवले तसेच लोकसंख्या नियंत्रण जनजागृतीपर पथनाट्य यासारख्या विविध उपक्रमांवर श्रमसंस्कार व जनजागृती करून शिबीर यशस्वी झाले. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रामुख्याने ‘युवकांमध्ये खरे श्रम संस्काराचे महत्त्व समजावणारी योजना म्हणजे एनएसएस’, ‘देश घडवण्यासाठी वाचन संपन्न, इच्छाशक्ती संपन्न व कार्यसंपन्न युवकांची आज आवश्यकता आहे,
यासाठी युवकांनी अशा योजनांमध्ये सहभागी व्हावे’ यावर भर देण्यात आला . यावेळी उपप्राचार्य डॉ. बी.एस देसले, डॉ. जालिंदर इंगळे, डॉ जे डी वसईत, डॉ.एम डी आहिरे, कुलसचिव समाधान केदारे, कार्यालयीन अधीक्षक श्री.एल.के निकम,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी, डॉ. विठ्ठल नजरधने , प्रा. सौ. कविता काखंडकी ,प्रा सि. डी.ठाकूर, प्रा. पदमर, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या शिंदे हिने केले.

