चांदवड येथे सकल मराठा समाज चांदवड तालुक्याची मुंबई वारीबाबत नियोजन बैठक संपन्न
दि.25/01/2024 रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबई वारी करणार आहेत. त्यांना महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचा पाठींबा घोषित आहे. चांदवड तालुक्यातून देखील सदर आंदोलनासाठी मुंबई वारी करणेकरीता नियोजन करणेकामी चांदवड बाजार समितीत दि.20/01/2024 रोजी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. याबैठकीत तालुक्यातील सर्व राजकीय नेते, सकल मराठा समाज मोठ्या संख्येत उपस्थित होते. या बैठकीत मुंबई वारीबाबत चांदवड तालुक्यात गटवाईज दि.21/01/2024 रोजी एकदिवसीय दौरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच सदर मुंबई वारी करीता नियोजनबद्ध काम होण्याकरीता कमिटीची स्थापना करुन सदर कमिटीचे अध्यक्ष श्री. संजय दगुजी जाधव यांची निवड करण्यात आली, तसेच सदर कमिटीवर दिपक हांडगे, आबा (दत्ता) गांगुर्डे, बाळासाहेब गाढे, प्रकाश शेळके, अनिल कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सागर देशमुख, गणेश निंबाळकर, राहुल कोतवाल, निवृत्ती घुले, सुखदेव जाधव, डॉ.शामराव जाधव, मनोज शिंदे, विलास भवर, प्रकाश चव्हाण, विकास भुजाडे, अनिल काळे, संपत वक्टे, घमाजी सोनवणे, निलेश काळे, अक्षय माकुणे, विजय गांगुर्डे यांची समिती सदस्य म्हणुन नेमणूक करण्यात आली. सदर दौ-याचे गटवाईज नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक गटास वेगवेगळे सकल मराठा समाजातील व्यक्ती गावा-गावांना भेटी देणार आहेत. त्याप्रमाणे चांदवड तालुक्यातील सकल मराठा समाज यांनी गावनिहाय दौ-यास उपस्थित राहावे.
यावेळी चांदवड – देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, शिवसेनेचे ( उबाठा) उपजिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
रविवार दि.21/01/2024 रोजी खालीलप्रमाणे गाव भेटी गट निहाय नियोजन पुढीलप्रमाणे –
दुगाव गट- राजदेरवाडी-8 वा., वडबारे 8.30 वा, नांदुरटेक 9 वा, राहुड 9.30वा, कळमदरे 10 वा, सुतारखेडे 10.30, डोंगरगाव-11.00, उसवाड-11.30, दुगाव-12.00 वा., कोकणखेडे 12.30वा. शिंगवे-01.00 वा., मेसनखेडे-01.30 वा., डोणगाव-02 वा., दरेगाव-2.30वा., निमोण 3 वा., वाद 3.30 वा., वराडी 4वा., कानडगाव-4.30वा., कुंदलगाव-5वा., दहेगाव 5.30वा., आहिरखेडे-6 वा., हरसुल-6.30वा., हरणुल-7 वा.
तळेगावरोही गट -पाथरशेंबे-8वा., न्हनावे8.30वा., पन्हाळे-9वा., विटावे-9.30वा., गंगावे-10वा., निंबाळे-10.30वा., रायपुर-11वा.,भडाणे-11.30वा.,कातरवाडी-12वा., वडगाव-12.30वा., तळेगावरोही-1वा., साळसाणे-1.30वा., काळखोडे-2वा., वाकी खु.2.30वा., वाकी बु.3 वा., वाहेगावसाळ-3.30वा. रेडगाव-4वा., सोनीसांगवी-4.30वा., काजीसांगवी-5वा., हिवरखेडे-5.30वा. निमगव्हाण-6वा. गणुर-6.30वा. बोपाणे-7वा., दिघवद-7.30वा.दहिवद-8वा., पाटे-8.30वा., दरसवाडी-9वा., पिंपळद-9.30वा.,
वडाळीभोई गट -मंगरुळ-8वा., तळवाडे-8.30वा., चिंचोले-9वा.,शिरसाणे-9.30वा., नारायणगाव-10वा., भाटगाव-10.30वा., परसुल-11वा., तिसगाव-11.30वा., उर्धुळ-12वा., देवरगाव-12.30वा., भोयेगाव-1.वा., जोपुळ-1.30वा. खडकओझर-2वा., खडकजांब-2.30वा., वडाळीभोई-3वा., भयाळे-3.30वा., गोहरण-4वा., शिंदे-4.30वा., भुत्याणे-5वा., मालसाणे-5.30वा., सोग्रस-6वा. शेलु-6.30वा. तांगडी-7.30 वा.आडगाव-8वा. आसरखेडे-8.30 वा.
वडनेरभैरव गट -धोंडगव्हाणवाडी-8वा., वडनेरभैरव-8.30 वा.,पिंपळणारे-9 वा.,बहादुरी-9.30 वा.,बोराळे-10 वा.,शिवरे-10.30 वा.,चिखलआंबे-11 वा.,पारेगाव-11.30 वा.,दुधखेड/नवापुर-12 वा.,दह्याणे/जांबुटके-12.30 वा.,कन्हेरवाडी/हट्टी-1 वा.,धोडांबे/कुंडाणे-1.30 वा.,कानमंडाळे-2 वा.,पुरी-2.30 वा.,खेलदरी-3 वा.,

