[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

यावल महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

यावल महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

यावल (प्रतिनिधी)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख व्हावी ह्या अनुषंगाने विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अर्जून पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे पदवी अभ्यासक्रमाचा बरोबरच नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करून नोकरीच्या संधी शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले.
या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
त्यात कु. कविता कोळी, कु. नेहा संजय सोनवणे द्वितीय कु. भाग्यश्री भोई तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. रजनी इंगळे, प्रा. सुभाष कामडी यांनी काम पाहिले

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या