मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा मंगरूळ ता.चांदवड उत्साहात शुभारंभ…
२००० माता-भगिनींना अर्जांचे वाटप करून हजार ९०० माता-भगिनींचे अर्ज भरले
राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”चा चांदवड तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेणुका इव्हेंट हॉल, मंगरूळ ता.चांदवड येथे आज शुभारंभ करण्यात आला. मोठ्या उत्साहात शुभारंभाचा हा कार्यक्रम पार पडला. या शुभारंभ कार्यक्रमासाठी मंगरूळ गणातील हजारो माता-भगिनी उपस्थित होत्या. या सर्व माता व भगिनींना जागेवरच या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी चांदवड तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे तहसील व पंचायत समिती कार्यालयाचे मोठे सहकार्य लाभले. अनेक आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माता-भगिनींना आवश्यक सरकारी कागदपत्रे देणे व त्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम केले. त्यामुळे मंगरूळ गणातील माता-भगिनींना खूप मोठी मदत झाली. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी चांदवड तालुक्याच्या वतीने मी आभार मानले.

याशिवाय चांदवड- देवळा मतदार संघात महिल्याभरात गण निहाय अभियान राबविले जाणार आहे. तसेच या योजनेचा प्रत्येल महिलेला कसा लाभ होईल याची काळजी संबंधित विभागाने घ्यावे. त्याचबरोबर योजनेचे अर्ज दाखल करतांना कोणत्याही प्रकारे पैश्याची देवाण घेवाण करू नये व कोणीही योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही आहे ही योजना पुर्णपणे मोफत शासनाकडून राबविण्यात आलेली असल्याचे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी भाषणात सांगितले. चांदवड तालुक्यात एकूण ४०.००० हजार महिलांना या योजनेचा लाभ भेटणार असून या योजनेतून दरमहा चाळीस हजार महिलांना एकूण ६ कोटी रु. बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.
भाजपचे सर्व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात माता-भगिनींना कोणतीही अडचण येणार नाही याची मनापासून काळजी घेतली. 
पहिल्याच दिवशी २००० हजार माता-भगिनींना योजनेच्या अर्जांचे वाटप करून ९०० माता-भगिनींचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्यात आले. इतर अर्ज ही ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. तसेच पुढील शुक्रवार दि.१८ जुलै २०२४ रोजी निमगव्हान येथील इच्छापूर्ती लॉन्स येथे अभियान होणार आहे. अभियानास जास्तीत जास्त महिलांना उपस्थित राहुल आपले अर्ज भरण्याची आवाहन ही आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी केले आहे.
डॉ.आत्माराम कुंभार्डे, डॉ.नितीन गांगुर्डे, तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, बालविकास अधिकारी श्री.सचिन शिंदे, श्री.योगेश ढोमसे, श्री.शांताराम भवर, श्री.सुनील शेलार, श्री.विजय धाकराव, श्री.गणपत ठाकरे, श्री.गोरख ढगे, श्री.सुभाष पुरकर, श्री.मन्सूर मुलाणी, श्री.दौलतराव आहेर, श्री.शरद ढोमसे, श्री.अरुण देवढे सर, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.पवन जाधव, श्री.श्रीहरी ठाकरे, केशव खैरे, मिलींद खरे, श्री.अमर मापारी, श्रीमाती.गीताताई झालटे तसेच आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसुल विभाग, पंचायत समिती अधिकार, कर्मचारी व मंगरूळ गणातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

