मनमाड महाविद्यालयात डॉ. स्मिताताई प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीच्या कोषाध्यक्ष डॉ.स्मिताताई प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले यांनी आपल्या मनोगतातून हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे महत्त्व व गरज विशद केली. या शिबिरात १४६ विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक प्रा. डी व्ही सोनवणे, पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ पी.बी परदेशी, प्रास्ताविक डॉ जे डी वसईत तर आभार प्रदर्शन महिला विकास समिती अध्यक्ष प्रा कविता काखंडकी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जगताप, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवन राऊत, लॅब टेक्निशियन रामेश्वर पांचाळ, समुपदेशक निलेश मोरे, राहुल भगत, यशश्री आव्हाड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना, प्राणिशास्त्र विभाग,महिला विकास समिती व जनसंपर्क विभाग यांनी केले.

