[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रावसाहेब जाधव यांचा शैक्षणिक व्हिडिओ जिल्हा स्तरावर प्रथम

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

रावसाहेब जाधव यांचा शैक्षणिक व्हिडिओ जिल्हा स्तरावर प्रथम

सोग्रस येथील श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रावसाहेब खंडेराव जाधव यांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी इयत्ता 9वी व 10वी या गटासाठी भाषा विषयातील व्याकरण घटकावर व्हिडिओ निर्माण केला. तो व्हिडीओ चांदवड तालुका स्तरावर प्रथम आला आणि नाशिक जिल्हा स्तरावर देखील प्रथम आला आहे.
रावसाहेब जाधव यांचा youtube चॅनल असून, त्यावर ते अनेक शालेय शैक्षणिक व्हिडीओ आणि जात्यावरच्या ओव्यांचे व्हिडीओ अपलोड करत असतात. त्याचा उपयोग अनेक विद्यार्थ्यांना व पालकांना अभ्यासासाठी होत असतो.
या कामासाठी त्यांना मा. गटशिक्षणाधिकारी श्री. राम बोडके साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. वसंतराव खैरनार साहेब, शा. पो. आ. अधीक्षक श्री. संदीपकुमार शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे श्री प्रशांत भास्करराव बनकर (संस्था सचिव) श्री उत्तम मुरलीधर गांगुर्डे (अध्यक्ष) श्री आंबू रावजी शिंदे, श्री दौलतराव गजाबा लोखंडे, श्री दीपक पवार (पं. स. चांदवड) श्री. विजय पवार (केंद्रप्रमुख सोग्रस) श्री विशाल पवार (प्र. केंद्रप्रमुख) श्री संतोष चव्हाण, तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री अशोक महाराज गांगुर्डे, श्री संजय संपत गांगुर्डे, श्री प्रकाश तुकाराम गांगुर्डे, श्री सहदेव यशवंत गांगुर्डे, श्रीमती विमलताई रामकृष्ण गांगुर्डे, शा. व्य. समिती अध्यक्ष श्री शंकर राजाराम गुरगुडे, उपशिक्षक श्री भगवंत बोरगुडे, श्री कडू थोरमिसे, श्री सुभाष गांगुर्डे, श्री प्रवीण पगारे, श्री माणिक गांगुर्डे, श्री कौतिक शिंदे, श्री विजय देवरे, चांदवडी रुपय्या प्रतिष्ठानचे सचिव सागर जाधव जोपुळकर, उपाध्यक्ष, रवींद्र केदा देवरे, मुख्याध्यापक श्री. वेंदे सर, सूर्यभान भांबर सर, चित्रकार देव हिरे, श्री पोपटराव पुरकर, श्री दीपक महाले, सौ अश्विनी महाले , श्री सुरज माने, श्री शांताराम हांडगे, श्री राजेंद्र अभिमान चव्हाण, श्री सुरज जाधव यांनी अभिनंदन केले…

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या