[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड नजिक नवीन टॅक्टर घेऊन जाणा-या टेम्पोला आग चार लाखाचे नुकसान

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड टोल नाक्याची अग्निशामक दलाची गाडी तेथे पोहचली मात्र टेम्पो व  टॅक्टर  शार्ट सर्किटमुळे जळून  टेम्पोचे एक लाख  तर नवीन टॅक्टरचे तीन लाख  असे एकूण  चार लाखाचे नुकसान झाले असावे अशी प्रत्यक्षदर्शीनी शक्यता नोंदवली.

सुमारे चार लाखाचे नुकसान

चांदवड  –   चांदवड शिवारात मुंबई आग्रारोडवर श्री. रेणुका देवी मंदिर घाटातुन जातांना म्हसोबा मंदिराजवळ  टेम्पो व नवीन टॅक्टरला आग लागुन सुमारे चार लाखाचे नुकसान झाले. शुक्रवार दि.  10 सप्टेंबर रोजी  दुपारी चार वाजेच्या सुमारास  पंकज सोपान खरात रा. दुगाव ता.चांदवड हे  मालेगाव मनमाड  चौफुलीवरुन  समर्थ टॅक्टर शोरुम मधुन   कुबेटा कंपनीचा  बी.2741एच.पी.टॅक्टर   हा महिंद्र कंपनीच्या मॅग्जीमो  टेम्पो क्रमांक   एम.एच. 19/  बी.एम. 5094  हे टाकून  तो टॅक्टर  नाशिक आडगाव येथे पोहच करण्यासाठी  मालेगाव येथून जात असतांना  म्हसोबा मंदिराजवळ  पाठीमागुन  येणा:या  एका इसमाने चालक पंकज खरात यास सांगीतले की, टेम्पोला पाठीमागे आग लागली  तातडीने टेम्पो थांबवून  आग विझविण्याचा  प्रयत्न केला असता   आग विझली नाही. तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या गाडीवाल्याने चांदवड टोल नाक्यावर  टेम्पोला आग लागल्याचे सांगीतले . तेव्हा चांदवड टोल नाक्याची अग्निशामक दलाची गाडी तेथे पोहचली मात्र टेम्पो व  टॅक्टर  शार्ट सर्किटमुळे जळून  टेम्पोचे एक लाख  तर नवीन टॅक्टरचे तीन लाख  असे एकूण  चार लाखाचे नुकसान झाले  याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात जळीतांची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या