[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज

लेखणीची सामाजिक बांधिलकी अधिक प्रगल्भ करणारा ‘चांदवडी रुपय्या’ पुरस्कार सोहळा!

यांनी लिहिलेले website

शब्दांच्या पारखेतून अस्सल हिरे शोधणाऱ्या ‘चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ, चांदवड’ने यंदाच्या २०२६ च्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करून साहित्य वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. मंडळाचे सचिव सागर जाधव जोपूळकर यांनी ही घोषणा केली. प्रसिद्ध कवी संदीप देशपांडे व ग्रंथमित्र रवींद्र देवरे यांच्या परीक्षक समितीने अत्यंत पारदर्शकपणे अनेक निकष लावून ही गुणपत्रक निवड केली आहे.

यंदाचा ११,००० रुपये रकमेचा ‘युवा साहित्य पुरस्कार’ दोन लेखकांना विभागून जाहीर झाला आहे. यात चंद्रपूरचे युवा लेखक अविनाश पोईनकर यांच्या ‘सुरजागड: विकास की विस्थापन?’ या पुस्तकाचा समावेश आहे, ज्याने गडचिरोलीतील आदिवासींचा लढा जिवंतपणे मांडला आहे. तर रत्नागिरीचे डॉ. अनिकेत मयेकर यांच्या ‘स्टेथोस्कोप’ या पुस्तकाने दवाखान्यातील मानवी नाते आणि संवेदनशील अनुभवांचे भावविश्व उभे केले आहे.

तसेच, सांगलीचे कवी चंद्रकांत बाबर यांच्या ‘माझ्यातल्या कवितेची हळूहळू होऊ लागली आहे वाफ’ या कवितासंग्रहाला ३,५०० रुपयांचा ‘काव्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. मातीची ओढ असणाऱ्या या कविता आहेत.

​॥ खणखणीत विचारांचा खणखणीत सन्मान ॥

​’चांदवडी रुपय्या’ २०२६ च्या राज्यस्तरीय पुरस्कारांची अधिकृत घोषणा: साहित्य आणि संवेदनेचा गौरव !

चांदवड: ग्रामीण साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी आणि शब्दांच्या पारखेतून अस्सल हिरे शोधणारी चळवळ म्हणजे ‘चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ, चांदवड’. या मंडळाने २०२६ सालासाठीचे अत्यंत प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय ‘युवा साहित्य’ आणि ‘काव्य पुरस्कार’ नुकतेच जाहीर केले आहेत. यंदाचे हे पुरस्कार साहित्यातील सामाजिक संघर्ष, मानवी जाणीवा आणि चिंतनशील काव्याचा त्रिवेणी संगम साधणारे ठरले आहेत. या पुरस्कारांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अत्यंत पारदर्शक आणि चोखंदळ निवड प्रक्रिया. प्रसिद्ध कवी संदीप देशपांडे  आणि ग्रंथमित्र रवींद्र देवरे यांच्या परीक्षक समितीने अनेक निकषांवर आधारित, विविध पातळीवर सखोल चर्चा करून आणि गुणपत्रक तयार करून ही निवड केली आहे. परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आम्ही केवळ पुस्तक म्हणून नव्हे, तर त्यामागील संशोधक वृत्ती, भाषेचा जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध मुद्दोंवर कस लावून ही निवड केली असून या साहित्यकृती मराठी साहित्याच्या कक्षा अधिक रुंदावणाऱ्या आहेत. यामुळे ‘चांदवडी रुपय्या’ पुरस्कारांचे महत्त्व आणि विश्वासार्हता अधिक अधोरेखित झाली आहे.


​यंदाचा ११,००० रुपये रकमेचा ‘चांदवडी रुपय्या युवा साहित्य पुरस्कार २०२६’ हा ‘कथा-ललित-वैचारिक’ या गटासाठी विभागून दोन महत्त्वाच्या साहित्यकृतींना जाहीर झाला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील युवा लेखक अविनाश पोईनकर यांच्या ‘सुरजागड: विकास की विस्थापन?’ या पुस्तकाचा समावेश आहे. गडचिरोलीतील सुरजागड पहाडावरील लोहखाणीचा प्रश्न आणि आदिवासींच्या अस्तित्वाचा लढा लेखकाने अत्यंत तटस्थपणे पण संवेदनशीलतेने मांडला आहे. ज्याला प्रशासन ‘विकास’ म्हणते, तो आदिवासींसाठी त्यांच्या संस्कृतीचा विनाश कसा ठरू शकतो, याचे जिवंत चित्रण यात असून लेखकाने तीन वर्षे या भागात प्रत्यक्ष राहून केलेले हे संशोधन अस्वस्थ करणारे आहे. याच पुरस्काराचे दुसरे मानकरी रत्नागिरीतील डॉ. अनिकेत मयेकर असून त्यांच्या ‘स्टेथास्कॉप’ या गाजलेल्या पुस्तकाने वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनांचे दर्शन घडवले आहे. स्टेथास्कॉप हे केवळ यंत्र नसून ते रुग्णाच्या मनात दडलेली वेदना ऐकण्याचे माध्यम कसे बनते आणि डॉक्टर-रुग्ण यांच्यातील मानवी स्पर्श कसा महत्त्वाचा आहे, याचे हृदयस्पर्शी अनुभव डॉ. मयेकर यांनी ओघवती भाषेत मांडले आहेत. तसेच, ‘सार्वजनिक वाचनालय चांदवड’ च्या वतीने दिला जाणारा ३,५०० रुपये रकमेचा ‘चांदवडी रुपय्या काव्य पुरस्कार २०२६’ सांगली जिल्ह्यातील संवेदनशील कवी चंद्रकांत बाबर यांच्या ‘माझ्यातल्या कवितेची हळूहळू होऊ लागली आहे वाफ’ या संग्रहास जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि निमशहरी जगण्यातील वास्तववाद, मातीची ओढ आणि अनुभवांच्या भट्टीतून तावून निघालेली चिंतनशील काव्यप्रतिभा ही बाबर यांच्या कवितेची ओळख आहे.


​या खणखणीत निवडीचे ‘चांदवडी रुपय्या’ परिवारातर्फे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे. मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र केदा देवरे व सचिव सागर जाधव जोपुळकर यांच्यासह डॉ. राजेंद्र मलोसे, शांताराम हांडगे, भागवत मांदळे, शिवराज पाटील, संदीप गुजराथी, वाल्मिक सोनवणे, सविता दिवटे, सविता दरेकर, हर्षल गांगुर्डे, अजित जाधव, प्रफुल्ल सोनवणे, सुशीला संकलेचा, बाळा पाडवी, जनार्दन देवरे, राजेंद्र उगले, प्रतिभा खैरनार, विजय निरभवणे, वंदना गांगुर्डे, देव हिरे, गंगाधर सोनवणे, माया ठोके, शैलजा जाधव, ज्योती शेळके, दिगंबर देवढे, अभिलाषा दायमा, सोमनाथ पगार, नितिन शिंदे, रुपाली खैरनार-दिवेकर, विक्रम देवरे, दिलीप घोगरे, डॉ. दिलीप पवार, शिवानी गुजराथी, मधुकर रौंदळ, महेश ठाकरे, केशव वाकचौरे, राजू पगारे, गुरुदेव गांगुर्डे, अभिषेक गांगुर्डे, छाया झाल्टे, भास्कर देशमाने, वैशाली शिंदे, निलेश गांगुर्डे, प्रवीण मोरे, रवींद्र पवार, सोमनाथ पवार, तिलोत्तमा घुले, गणेश महाले, मोहिनी शेजवळ, रितू जाधव, राहुल केदारे, सायली आचार्य, सोमनाथ जाधव, सुभाष कोल्हार, सुनील भदाणे, डॉ. सुरेश पाटील, मेधा मलोसे, दिनेश शिंदे, चांगदेव कुदणर, हेमांगी बर्वे, गोरख डगळे, भूषण महाराज कोतवाल, अमर ठोंबरे, अजित अहिरे आणि बाळकृष्ण जाधव यांनी सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

 

लेखकाबद्दल

website

एक टिप्पणी द्या