[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज

मायमातीच्या वेदनेचे आक्रंदन : ‘माती मागतेय पेनकिलर’

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

मायमातीच्या वेदनेचे आक्रंदन : ‘माती मागतेय पेनकिलर’
कवी लेखक:-सागर जाधव जोपुळकर
प्रकाशक:-युवराज भटू माळी अथर्व पब्लिकेशन,धुळे
प्रथमवृती:-३० जून २०२४
मुखपृष्ठ:-अरविंद शेलार,चित्रलय
आतीलचित्रे:- विष्णू थोरे.
किंमत:-१९५/रुपये
पुस्तक परिचय:- डॉ प्रभाकर शेळके जालना

मायमातीच्या वेदनेचे आक्रंदन : ‘माती मागतेय पेनकिलर’

– डॉ प्रभाकर शेळके जालना

कवी सागर जाधव जोपूळकर यांच्या कविता संग्रहाने अतिशय हेलावून सोडले.ज्या मायमातीसाठी आपल्या बापजाद्यांने उभे आयुष्य घामात घातले आणि मुठभर पेरुन गाडीभर आणले.त्याचं माय मातीच्या उदरात आज रासायनिक खते टाकून तिच्या जीवाचा अंगार करताहेत.
तरीही ती ओंजळभर सुखाचा घास देतेचं पण इथल्या या व्यवस्थेच्या दलालच लाल होऊन गेला आहे.कुणबीक करणारा ठार होऊन गेलेला आहे.कवी सागर जाधव जोपुळकर हे आधुनिक शेतीतंत्रज्ञ प्रगतशील शेतकरी व
प्रत्यक्षात शेतीमातीची मशागत करणारे शेतकरी युवक आहेत.मातीने कुणबीक करणाऱ्यांना आभाळभरून दिले
पण कवी सागर जाधव जेव्हा आपल्या सृजनशील दृष्टीने चिंतन आशय मांडतात तेव्हा तो एक संयत मनोभूमिकेतून अस्सल अनुभव आहे.घामाचे मोल आणि मातीची ओलं तशी नाहीच मोजता येतं इथे भंयकर वास्तवाची सल सलते ती कविता म्हणजे ‘माती मागते पेन किलर’ या मायाभूईच्या मृदगंधाची ओवी व्हावी तशी ज्या मुरमाड मातीतून आमचं आयुष्य बागायती करणारे दगूना अन् गंगाई बारोमास वावर वहीती ठेवणारे वडील संजय जाधव
तुकोबांच्या गाथेला व अंकुरणाऱ्या कोंबाला हे अर्पणपत्र म्हणजे या मातीच्या चरणाशी नतमस्तक होने.तुकोबांच्या ओवी अंभगाचा थांग या कवितेच्या पानावर येतो ती निस्सीम शेतीमातीची निष्ठा आहे.’ओले मुळ मेंदी खडकाचे अंग!अभ्यासासी सांग कार्यशीधी’ही कविता तितक्याच ताकदीने आली आहे.आजच्या युगाची तंत्रकुशलता आत्मसात केली.बैलबारदान कमी झाला नी ताकदवान यंत्राचं तंत्रज्ञान येऊन आम्ही शेती करतो आहोत.पण ज्या माईनं आम्हाला गाड्यानं दिलं तिथं आज ट्रक ट्रॅक्टरने अमाप माल दिला.इथल्या दलालांने शेतकऱ्याला हलाल केले.तू एवढं पिकवतो आहेस! पण तूझ्या मालाचा भाव तूला नाही करता येतं.मातीनं जीवतोडून शेतकऱ्याला समाधानी केलं.पण तिच्या पोटाचा अग्नीडाव झालं म्हणून ही माती,ही शेती,हे वावर हाताची ओंजळकरून द्यायची.


युगाच्या अगतिक व जागतिक माती याचक होऊन.
जगण्याची भिक मागते आहे ‘पेनकिलर दे!
‘पडीत ठेवून तिची कस्स वाढवल्या जायाची.आज हे सारं ‘पी हळद व्हय गोरी,कमी वयात व्हय नवरी’.तो मातीचा हात.इथल्या व्यवस्थेने केला.मी हादरून गेलो.ज्या शेती मातीत मी जन्मलो तीचं माती आज प्रचंड वेदनेने विव्हळते आहे.आणि टाहो फोडते आहे.बाळ मला आता पेनकिलर दे! माझ्या ठणकेची सल तू जाणून घे!अतिशय उमदा कवी सागर यांच्या काव्यातील प्रतिमा प्रतिके आणि या भूमीनिष्ठ भूमीजनांच्या वेदनेचा हुंकार ही कविता देऊन जाते.रक्ताळलेल्या जाणिवा या कवितेमधून उजागर केल्या आहेत.जशा, ‘ह्युमिकशिवाय वाढतं नाही मुळ्या’हे सांगताना कवीनं’सुगंधी माणसाचा दरवळ,काळीज कापलं तर काळीज माती, माझं बालपण गोड आठवणी व भेगाळलेल्या जखमा, काळीज हृदय मोटर स्टार्टर सारखं!
नाकाल रुमाल लावा तुम्हाला वास येईल पोटॅश युरीया,
सुपर फॉस्फेटाचा,हे सारं कवी सांगतो.एखादी तुमच्या माझ्या आयुष्यातली असेल कविता.हा माय माती वरच्या निस्सीम भक्तीचा मळा आहे.म्हणून तितक्याच संयत विद्रोहाने कवी लिहितो “नाच नाच रे विठ्ठला मेरावर
हे शेत शिवार तुडव बा”(पृ.१३) ही कविता कृषीक वेदनेचा हुंकार मांडते.समकालीन शेतीमातीची नाळ कायमचं आहे.
तिची या व्यवस्थेने हेळसांड मांडली आहे.
आजच्या युगाची गावपांढरी म्हणजे ‘ॲम्युनिटी नगर’हे सत्य वास्तव आहे “विक शेती प्लाट पाड/ॲम्युनिटी नगरमध्ये/बापजाद्याचे मुडदे गाड/कशाला पेरण्या, कशाला वखर?/वावरात वसवं मोठं नगर/नको कर्ज नको उचल/नको जुगाराचा डाव/काॅलनीला मात्र तुझंच नाव लाव!(पृ.१५)आजच्या कृषीकांच्या वेदनेचा हा आक्रोश आहे.जग बदलांच्या खुणा इतक्या भंयकर झाल्या आहेत.
माती महामुर देते आहे पण इथल्या सामाजिक राजकीय व्यवस्थेचा बळीवंत अजूनही बळी पडतो आहे.रासायनिक
खतांचा डोस इतका झाला आहे की, कुणबीक हीच बेभरवशाची झाली आहे.खता बी औषध फवारणीचे ही पैसे फिटता फिटत नाही.त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करायची म्हटले की शेतीला जोडधंदा असेल तरच तो शेतकरी यशस्वी आहे.पण या ‘ॲम्युनिटी मातीत उगवून आले चोर’निर्माण झाले.ही सखेद वेदना आहे.सिमेंटचा दगड “मी बोरवेलने पाणी शेंदलं/बुलडोझरने आभाळ कोरलं/अन् पेरत गेलो/माझ्यातून हरवलेलं, माणूसपण!(पृ.१९)ही मातीच्या उताऱ्यावरची ॲम्युनिटीची नोंद मनाच्या ठिकऱ्या करते.मनासारख शेत बहरत नाही.
शिवारातला तुकाच मुका झाला,भाऊबंदकीच्या या कुणबीची बेकी जाऊन नेकी व्हावी.या जगाच्या पोशिंदा
पण ही तफावत दूर होत नाही.बॅंकेच्या कर्ज फिटता फिटेना इंडरेचा डबा घेयाला पैसे नाहीत.सपरातली वासरे तेवढी खुट्याला राहिली अन् हंबरणाऱ्या गाई खाटकाला विकल्या..’देणं अन् घेणं जीव गहाण ठेवणं’हीकुणबीकीची सालोसालं बर्बादी.चिरिमिरी देऊन सबसिडी.तीही कशी रेंगाळून जाते शेतकऱ्यांच्या हाती कोरा सातबारा देते.
“शेवटी त्याला माहित असते ऑडीट मधली/नेमकी क्युरी/माल जाणार बेभावात/सांगायची होते चोरी/(पृ.३)ही कविता आजचे वास्तव तुकोबांच्या शैलीने मांडते.
“वाऱ्यावर फडफडणारा रंगीन झेंडा”या काव्य भागात ‘आरसा मनाचा उजळीत बिंब,तूच प्रतिबिंब समाजाचे’ ही कविता शेतकऱ्यांच्या नावाने खोटा टोह,खोटा माॅब हलवून त्याचा आपल्यासाठी वापर करून घेयाचा.ही आजच्या माॅबला कुठलीच व्याख्या नाही?कारण हा वास इथल्या व्यवस्थेचा.डिव्हायड इन चीफ,फाॅरेस्ट,मेक इन फाॅरेस्ट, जंगलं सर्व्हिस टॅक्सची लुट,सर्जिकल स्ट्राईक,ही इथल्या
आजच्या वर्तमानाची भाषा घेऊन ही कविता थेट प्रक्षेपण करते.फक्त कष्टकऱ्यांचा वापर करून घेयाचा.अंधश्रध्देचा गरका अजून चालू आहे.’झ’झबल्याचा केव्हाच गेला.नवी बाराखडी “ए फाॅर ॲसिड,बी फाॅर ब्रेक अप के फाॅर किस/
अ अजगर नाही अराजकता,बी बदक नाही बंदुक/क कमळ नाही केळ/ झ झबला गेला केव्हाच फाटून गुरूजी/
पोरांच्या मनासारखा अन् केळाच्या सालीसारखा” (पृ.५२)
ही आजच्या वर्तमानाची अस्वस्थ कविता आहे.’शेठ आलेत मेरावर.आज इथे डिजिटल ‘कृषी पर्यटन’ लाऊन लिंबू काकडी भेंडी, सॅलड्स शिवाय कस्टमर बिर्याणी खात नाही.”सगळं कसं गावरान हवं/शेण सारवण भिंतीवर/धोतर कोपरी घालून उभा रहा/शेठ आलेत मेरावर'(पृ.५६)
असं गाव शिवारात घडतं आहे म्हणून या गावगुंडांनी गावं
भुंडाड केलं.जमीनी विकून ग्रामपंचायत लढली पाहिजे,
बिस्लरीचं पाणी टाकून दारू ढोसली पाहिजे.चखण्यापुर्ती शेती विकली पाहिजे/म्हणजे होणार नाही गावं भूंडाड.
अशी आजच्या काळातील गाव खेड्याची दारुन अवस्था
झाली आहे.हे वास्तव नाकारता येतं नाही.या कवितेची सृजन समर्पक्ततेची दखल घेतली गेली पाहिजे.’स्वत:वर फाॅस्फेटचा स्प्रे मारुन घेताना’हा कवितेचा मर्मग्राही अनुबंध म्हणजे एक चिंतन असे की,आज या शेतीमातीची कुणालाच अस्था राहिली नाही.जगाचा पोशिंदा फक्त वल्गना करुन त्याच्या नावाने मलिदा चाटून खाणे.या वैश्विक वर्तमानाशी आम्हाला गुंतून ठेवत.’सचिन आऊट होतो चौथ्यांदा,मुलं स्वप्न पाहतात उद्याची, जाहिराती पाहतो.आरक्षणचं गाजर दाखवल्या जाते.हा तरूणाईचा ताळेबंद पार चुकतोय.’रिसर्च,पोऱ्या च्युत्या झालाय.तुमची शपथ मालक मी चांगला गुलाम झालो नाही.माणुसपणाचं खुलेपण!हेच गाठोडं तननाशक पाजून खून करतय,’
सगळाच डाटा उडालेला ही आजच्या कुणब्यांच्या पोरांची अवस्था पहा “अतिताण आल्यावर/रॅम होऊन जाते स्लो,/प्रत्येक रॅमच्या नसानसात/होतं राहतो मृत्यूचा फ्लो/अखेर; शेवटी; अंतिमतः/दी एण्ड असतो प्रत्यकाचा ठरलेला./मग फ्युज उडतो तेव्हा/सगळाच डेटा उडालेला!(पृ.८१)इतकी भंयकर सल ही कविता देऊन जाते.
कवी सागर जाधव यांची मायमातीवरची निष्ठावंतभूमीनिष्ठ भूमिका घेऊन ही कविता आली आहे.पुर्वजांचा ऐतिहासिक वसा वारसा यात छत्रपती शिवराय,फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची धिरोदत्त प्रखर वास्तववादी संतविवेकी विचारांची बांधिलकी ही कविता देऊन जाते.’बलशाली बाहू’ “तू दिसला ज्योतीबाला कुळवाडी भुषण/लिहिली भीमाने राज्यघटना तुझ्या स्वराज्याच्या प्रेरणेने/ सार्थ ठरला ‘छत्रपती’/तुझ्या वारश्याला ‘शाहू’
असे अनंत आहेत शिवराय/
शाहू-फुले-आंबेडकर नावाने
तूझे बलशाली बाहू/ (पृ.९७) आपले आई वडील भाऊ आजोबा यांच्या जगण्याची व या मातीशी असलेली अदम्य्
इच्छा म्हणून त्यांनी कधीच केला नाही आत्महत्येचा विचार.शेवट शुन्य होऊन जागायचय आणि इथल्याचं बांधामेरावर राख होऊन जायचं.’शुन्यातून वजा झाल्यावर उरलेली इन्फेनीटी’ या भागात कवी उच्चतम विचार असा की,”शुन्य होतं जावे टिंब चमत्कार/शुन्याचा डोंगर महाकाय/ही अंभग मानाची भावना व्याकुळ करून जाते.
ख्यातनाम कवी समीक्षक डॉ पी.विठ्ठल बलवर्धक पाठराखण करतात “माती मागते पेनकिलर’ असे प्रतिकात्मक शीर्षक असलेला हा संग्रह शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव अधोरेखित करतो.म्हणूनच कविता वाचताना अंतर्मुख होतो.खिन्न होतो.आपल्या मनात नैराश्याची जाणीव टोकदार होतं जाते.पण हे नैराश्य म्हणजे त्रागा नाही.फ्रस्ट्रेशन नाही.तर आपण सर्वांनीच अपरिहार्यतेने स्वीकारलेल्या अनिश्चित आणि नि: स्वत्व काळाची एक निर्णायक आणि माणूसपणाला प्रतिसाद देणारी जाणीव आहे.कृषी जीवनासह समग्र सांस्कृतिक व्यवस्थेवर अत्यंत प्रभावीपणे आणि स्वतःच्या भाषेत भाष्य करणारी कविता आपल्याला अंतर्बाह्य व्यापून राहते.कारण या कवितेचे अनुभवक्षेत्र खूप विस्तृत आणि प्रामाणिक आहे.(पाठराखण) ख्यातनाम चित्रकार
अरविंद शेलार यांनी अतिशय आशय संपन्न मुखपृष्ठ केले आहे.कवी विष्णू थोरे यांचे आतील चित्र मनस्वी आहे.
कवी सागर जाधव जोपुळकर यांना हार्दिक शुभेच्छा.
()()()
पुस्तक परिचय:- डॉ प्रभाकर शेळके जालना

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या