चांदवड बाजार समितीच्या उपसभापती पदी मा.श्री.विक्रम भागवत मार्कंड यांची बिनविरोध निवड

चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीकरीता श्रीमती सविता शेळके, प्राधिकृत अधिकारी, तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.16/02/2026 रोजी सकाळी 11.30 वाजता बाजार समितीचे सभागृहात संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी उपसभापती पदासाठी विहीत वेळेत श्री.विक्रम भागवत मार्कंड यांचा एकच नामनिर्देशन अर्ज प्राप्त झालेनंतर निवडणुक कार्यक्रमानुसार छाननीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार छाननी अंती श्री. विक्रम मार्कंड यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला. उपसभापती पदाकरीता विहीत वेळेत एकच अर्ज प्राप्त झाल्याने प्राधिकृत अधिकारी श्रीमती शेळके यांनी श्री. विक्रम भागवत मार्कंड हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती श्री.नितीन आहेर, मा.आ.श्री.शिरिषकुमार कोतवाल, श्री डॉ.आत्माराम कुंभार्डे, डॉ.सयाजीराव गायकवाड, कारभारी आहेर, डॉ.राजेंद्र दवंडे, पंढरीनाथ खताळ, योगेश ढोमसे, संजय जाधव, वाल्मिक वानखेडे, सुशिल पलोड, रविंद्र पवार, सौ.मिना शिरसाठ, सौ.वैशाली जाधव, सचिव-गोरक्षनाथ गांगुर्डे, निवडणुक सहाय्यक चेतन राणे, डॉ. शामराव जाधव, बापु शिरसाठ आदी उपस्थित होते.

