[masterslider id="2"]
अध्यात्मिक संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगाव रेपाळ येथील पहाटेच्या काकड आरती च्या मंगलमय सुरांची त्रिपुरारी पौर्णिमेस उत्साहात सांगता

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

 

आडगाव रेपाळ येथील पहाटेच्या काकड आरती च्या मंगलमय सुरांची त्रिपुरारी पौर्णिमेस उत्साहात सांगता

आडगाव रेपाळ ( वार्ताहर ):– आडगाव रेपाळ ता.येवला येथील दररोजची पहाट येथील भजनी मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या काकड आरतीच्या मंगलमय सुरांनी सुरु होत होती. कोजागिरी पौर्णिमेपासून आडगाव रेपाळ येथील विठ्ठल मंदिरात काकड आरतीस प्रारंभ झाला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यत चालणाऱ्या या पहाटेच्या मंगलमय सुरांच्या भजनाने आडगावकर मंत्रमुग्ध झाले होते. त्याची काल त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मोठया उत्साहात सांगता झाली.
पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणाऱ्या काकड आरतीने गावातील सारे वातावरण उजळून निघत होते .
वै.ह.भ.प.जयराम .महाराज आडगाव रेपाळ यांचे कृपाआशिर्वादाने सुरू झालेली काकड आरती ह.भ.प.अंबादास महाराज जगताप यांचे प्ररणेने अविरत सुरू आहे. दिवाळीच्या सण उत्सावांत काकड आरतीचा सूर मिसळल्याने दूधात साखर पडत असते. या काकड आरतीचे नेतृत्व ह.भ.प. जनार्दन महाराज महाले ह.भ.प.वसंत आण्णा शेळके करीत आहे, ह.भ.प. शिवाजी महाराज गायके, अशोक महाले, महेश महाले, भाऊसाहेब निकम, बाबासाहेब गायके,दत्तु गायके,श्रावण गुंजाळ,
ज्ञानेश्वर जगताप, किशोर महाले,संपत बागुल,सिताराम निकम, भास्कर गुंजाळ, सौ.लताबाई महाले, सौ.मंगलबाई निकम,श्रीमती उमाबाई देशपांडे आदी काकड आरतीमध्ये सहभागी होत असतात.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या