नांदेड ,मालेगाव ,व अमरावती येथे झालेली दंगल यापुढे कोठेही होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणे बाबत आज चांदवड भाजपा कडून तहसीलदार यांना निवेदन

चांदवड : आज चांदवड येथील तहसीलदार प्रदीप पाटील यांना भाजपा च्या वतीने निवेदन देण्यात आले. नांदेड, मालेगाव व अमरावती येथील हिंसक वातावरण ने अवघ्या देशाला काळिमा लागली आहे व दहशतीचे वातावरण पेटलेले होते. यामुळे आपल्या हिंदू धर्माला डंक लागायला नको तसेच देशाचे भवितव्य टिकून रहावे यासाठी सर्व सामाजिकहित जोपासन्यासाठी तसेच सर्वधर्म समभाव टिकून राहण्यासाठी आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शासकीय प्रशकीय यंत्रणेला यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासनाचा वेळ व खर्च वाया जातो. यापुढे अश्या कोणत्याही दंगली होऊ नये यासाठी आज आमच्या भारतीय जनता पार्टी यांच्या कडून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे तसेच विविध ठिकाणी व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय येथे निवेदन देऊ करीत आहे. यापुढे असे कोणतेही दंगल होऊ नये यामुळे जीवित हानी व आर्थिक नुकसान व इतर नुकसान होते अधिकारी कर्मचारी वर्गाला दुःखचा सामना करण्याची वेळ पडायला नको यासाठी योग्य ती खबरदारी बाबत निवेदन आज चांदवड भाजपा च्या वतीने देण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल,प्रदेश कायम निमंत्रित सदस्य अशोक काका व्यवहारे,भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, चांदवड शहर अध्यक्ष प्रशांत ठाकरे,डॉ राजेंद्र दवंडे, वाल्मिक वानखेडे,वाल्मिक पवार,कैलास गुंजाळ,अंकुर कासलीवाल,मुकेश आहेर,महेश खंदारे,मनोज बांगरे,संजय पाडवी, विशाल ललवाणी,तुषार झारोळे,प्रतीक जाधव,युवराज आहेर आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

