चांदवड (प्रतिनिधी ) जे. बी .
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीराम विद्यालय रायपूर येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान अंतर्गत व सौ. ज्योतीताई आहेर पंचायत समिती सदस्य चांदवड यांच्या सहकार्याने व प्राथमिक आरोग्य विभाग पंचायत समिती चांदवड यांच्या सहकार्याने व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी विदयालयातील इयत्ता ९वी व १०वी च्या विदयार्थीनींची आरोग्य तपासणी केली त्यात हिमोग्लोबिन व सिकलसेल च्या तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सदस्या
ज्योतीताई आहेर ह्या होत्या प्रसंगी व्यासपीठावर विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे एस. जी. पुंडलिक गुंजाळ विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री .बिन्नर सर, श्री पाटील सर श्री . सोनवणे सर व सर्व जेष्ठ शिक्षक उपस्थित होते. आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे एस. जी. सरांच्या हस्ते संपन्न झाला. डॉ. जयदिप पंडोरे यांनी भाषणात कोविड व आपले आरोग्य विषयी विद्यार्थ्याना बहुमोल अशी माहिती सांगीतली . त्यानंतर विदयालयाचे मुख्याध्यापक श्री ठाकरे एस. जी. सरांनी आपल्या मनोगतात आरोग्य शिबिर व नव्याने संक्रमित होत असलेल्या कोरोना विषाणु बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्री. सोनवणे व्ही. पी.यांनी केले.

