आज दि.१७/०१/२०२२ रोजी चांदवड येथील प्रांत कार्यालयात आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपास्थितीत चांदवड व देवळा तालुक्यातील शासकीय अधिकारी यांच्यासमवेत कोविड आढावा बैठक घेण्यात आली..
यावेळी येणा-या काळात कोविड रुग्णामध्ये वाढ झाल्यास केलेल्या पूर्व तयारीचा तसेच लसीकरणाबाबत आढावा घेण्यात आला.. 
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री.चंद्रशेखर देशमुख, चांदवड तहसीलदार श्री.प्रदीप पाटील, देवळा तहसीलदार श्री.विजय सुर्यवंशी, देवळा गटविकास अधिकारी श्री.देशमुख, चांदवड गटविकास अधिकारी श्री.महेश पाटील, चांदवड तालुका आरोग्यधिकारी डॉ.पंकज ठाकरे, देवळा तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुधीर पाटील, देवळा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गणेश कांबळे, चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सुशील शिंदे, उमराणे ग्रा.रुग्णालयाचे डॉ.दीपक पवार आदींसह भाजपा तालुकाध्यक्ष श्री.मनोज शिंदे, पं. समितीचे मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे उपस्थित होते

