सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराष्ट्र नाशिक विभाग या दुर्गसंवर्धन संस्थेमार्फत पुरातत्व विभाग नाशिक आणि होळकर वाडा ट्रस्ट यांच्या सहकार्याने दिनांक ५ जून रोजी चांदवड या ठिकाणी असलेली होळकर वाडा ( रंगमहाल) ऐतिहासिक बारवेची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून मोहिमेची सुरवात करण्यात आली. या मोहिमेत बारवेत असलेला कचरा , माती आणि आसपासच्या परिसरातील स्वछता करण्यात आली. बऱ्याच वर्षांनंतर ह्या ऐतिहासिक बारवेने आज मोकळा श्वास घेतला. जिल्हा प्रशासक साईनाथ सरोदे आणि जिल्हाध्यक्ष गणेश घोटेकर यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नितीन शेळके धनंजय निलासकर यांच्यासह चांदवड निफाड मालेगाव तालुका आणि नाशिक या ठिकाणाहून दुर्गसेवक हजर होते.
या मोहिमेत ३५ दुर्गसेवक हजर होते. तसेच चांदवड येथील RSS चे स्वयंसेवक सृजन पाटील आणि इतर उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था संस्थापक श्रमीकजी गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले १४ वर्ष दूर्गसंवर्धन आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचे काम करत आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने आतापर्यंत २२ किल्ल्यांवर सागवानी प्रवेशद्वार बसवण्याचे काम केलेले आहे तसेच ४५ हुन अधिक तोफांना तोफगाडे बसवून त्यांना मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी आजच्या तरुण पिढीने पुढे यावे ह्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे युवकांना आव्हान करण्यात आले.

