[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर : कही खुशी कही गम

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारे संभाव्य इच्छुकांच्या मनाजोगते आरक्षण निघाल्याने आशा उंचावल्या, तर काही ठिकाणी राखीव झाल्याने काहींचा हिरमोड

चांदवड नगर परिषद 2022 यासाठी चांदवड नगर परिषदेकडून उपविभागीय अधिकारी तथा प्रशासन चंद्रशेखर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य निवडणूक आयोग यांच्या नियोजित कार्यक्रमाने आरक्षण सोडत जाहीर झाली असून सदर कार्यक्रम 9 जून 2022 रोजी जाहीर झाला असून त्या अनुषंगाने या नगरपरिषदेचा आरक्षण सोडत कार्यक्रम आज आज संपन्न झाला. यामध्ये 27-12-21 राज्य निवडणूक आयोग यांच्या परिपत्रकानुसार लोकसंख्या, प्रभाग रचनेनुसार लोकसंख्या, नकाशा, गुगलमॅप नुसार आरक्षण, या सर्व गोष्टींचा समावेश होता त्यानुसार सर्व निवडणूक प्रकिया पार पडली. यात प्रथम महिला आरक्षण सोडत काढण्यात आली असून यामध्ये 10 महिला ना नियमानुसार आरक्षण मिळाले.

सदर आरक्षण हे 15 डिसेंबर 21 च्या चक्रअनुक्रमाने आरक्षण घेणे साठी राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक दिलेले होते त्या निवडणूक परिपत्रकानुसार ही पहिली निवडणूक असल्याचे ग्राह्य धरुन या प्रमाणे आरक्षण काढण्यात आले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी
यात प्रभाग क्रमांक 1 ते 10 मध्ये अनुसूचित जाती साठी प्रभाग क्रमांक आठ व नऊ हे उतरत्या लोकसंख्येच्या क्रमाने आरक्षित झाले यात प्रभाग क्रमांक 9 (अ) मध्ये अनुसूचित जाती महिला व 9 (ब) मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण चिट्ठी सोडत मध्ये आरक्षण मिळाले आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी
तसेच अनुसूचित जमाती साठी प्रभाग क्रमांक 2 ,4 ,व 10 हे अनुसूचित जमातींसाठी राखीव असून यामध्ये हे 2 व 10 हे चिट्ठी सोडत ने दोन जागा साठी आरक्षित झाले असून यामध्ये प्रभाग क्रमांक 2 (ब) मध्ये अनुसूचित जमाती महिला व प्रभाग क्रमांक 10 (अ) अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण निघालेले आहे.

सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलांसाठी
तसेच यातील उर्वरित प्रभाग क्रमांक 1, 3, 5, 6, 7, यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये (अ) ला सर्वसाधारण व (ब) ला सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 3 (अ) ला सर्वसाधारण महिला व (ब) ला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 5 मध्ये (अ) सर्वसाधारण महिला व (ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 6 मध्ये (अ) सर्वसाधारण महिला व (ब) ला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 7 मध्ये (अ) सर्वसाधारण व (ब) सर्वसाधारण महिला असे आरक्षण मिळालेले आहे.

या प्रमाणे अनुसूचित जाती महील व अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले असून यावेळी चांदवड देवळा उपविभागीय अधिकारी तथा चांदवड नगरपरिषद प्रशासक चंद्रशेखर देशमुख, चांदवड नगरपरिषद मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, चांदवड नगर परिषद कार्यालय प्रमुख हर्षदा राजपूत ,बांधकाम अभियंता शेषराव चौधरी , अमोल आहेर , तुषार बागुल , सत्यवान गायकवाड,संजय गुरव, शैलेश पवार आर मूव्हीज शेख आदींनी काम बघितले तसेच आरक्षणाची चिठ्ठी काढण्याकरिता मोहम्मद शेख, खदिजा शेख, मोहम्मद शेख या चिमुकल्यांनी लोकप्रतिनिधींचे आरक्षणाचे भवितव्य आपल्या हातून चिठ्ठी काढून ठरविले व कार्यक्रमाची सांगता सर्वांचे आभार मानून उपविभागीय अधिकारी यांनी केली.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या