जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव-समारंभ, नवागतांचे स्वागत,पुस्तक व खाऊ वाटप,गणवेश वाटप,शिक्षणफेरी आणि शाळा पूर्वतयारी उपक्रम इ.चे आयोजन करत उत्साहात संपन्न झाला.
आज शाळेच्या २०२२-२३ या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शालेय परीसरातील रांगोळ्या,फुगे व फुलांची सजावट इ.मुळे रंगबिरांगी वातावरणात झाली.
.इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या ईश्वरी कान्हू देवरे हिच्या पावलांचे कूंकवपाण्यातील ठसे घेत प्रवेशोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी पहिलीतील विद्यार्थ्यांचे औक्षणही करण्यात आले. 
मुख्याध्यापक श्री.किशोर सुर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.विक्रम गांगुर्डे,उपाध्यक्ष श्री.नवनाथ पगार,सदस्य श्री .कान्हूजी देवरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास गावातील अंगणवाडी सेविका श्रीमती आशाताई गरूड,सौ.मनिषा गांगुर्डे,सौ.कुसूम देवरे ,सौ.अश्विनी देवरे यांनी विशेष सहकार्य करीत मनोरंजक पद्धतीने पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.गावातून काढलेल्या शिक्षण फेरीने पालकांमधील उत्साह वाढवला तर नवी पूस्तके , नवा गणवेश व खाऊवाटपाने मुले नवाच आनंद अनुभवत होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पहिलीच्या वर्गाचे वर्गशिक्षक श्री,साहेबराव देवरे यांनी केले तर श्रीमती शोभना बिरारी,
श्रीमती बोरसे,श्रीमती अहिरे ,श्रीमती पवार या महिला शिक्षिकांनी रांगोळी काढून , फुगे व फुलांची सजावट करुन परीसर सुशोभित केला.
कार्यक्रमाचे संयोजनपदवीधर शिक्षक श्री.रविराज पाटील, उपशिक्षक बाळासाहेब सावंत , दीपककुमार निकम , रमेश राऊत सर यांनी केले तर जनार्दन देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

