[masterslider id="2"]
क्रीडा संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जिजामाता प्राथमिक शाळेतील मुलांना गायनाचे धडे.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

जिजामाता प्राथमिक शाळेतील मुलांना गायनाचे धडे.

लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित आय एस ओ मानांकित
जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रम अंतर्गत गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शाळेत वर्षभर दप्तरमुक्त शनिवार उपक्रम राबविला जातो.
या अंतर्गत संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालयातील गीतमंच्याच्या विदयार्थिनींनी,प्राथमिक शाळेतील लहान मुलांना विविध प्रकारच्या वाद्यांचा परिचय करून दिला. तबला, हार्मोनियम (संवादिनी), झांजरी, ढोलकी, मृदूंग, चिपळ्या इत्यादिंचा समावेश होता.
तसेच गीत व संगीत याविषयी सखोल माहिती सांगितली.यानंतर विविध प्रकारचे गीते म्हणून दाखविली.गीतांचे विविध प्रकार व हार्मोनियमचे सप्त सुर समजून सांगितले. देश भक्तीपर गीत,भावगीत,प्रार्थना,भजन,अभंग इत्यादी.लहान मुलांनी देखील अनुकरण करत गीत गायन केले तसेच विविध कविता,बडबड गीते,प्रार्थना यांचे सादरीकरण केले.
गीतमंच प्रमुख देवयानी चव्हाणके हिच्या सह कादंबरी कुलकर्णी,समीक्षा जगताप,सिद्धी साबळे,भक्ती पाटील,स्वरदा कटारे,श्रद्धा जाधव,खुशी फापाळे,गायत्री निकम या विद्यार्थ्यांनींनी गीत गायन व वादन करून सर्वांना मंत्र मुग्ध केले.तसेच लहान मुलांना गायनाचे धडे दिले.यासर्व विद्यार्थीनी जिजामाता प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थीनी आहेत.
संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पंचायत समिती सदस्या रंजना पाटील, संचालिका नीता पाटील, पुष्पाताई दरेकर,संचालक सीताराम जगताप, कैलास ठोंबरे, शंतनू पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील आदींनी या नावीन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
उपक्रम यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिस काझी, उप शिक्षक मोहन निकम,कैलास भामरे, सुहास बच्छाव, दिलीप शिरसाठ, समीर देवडे, राजाराम जाधव, केदूबाई गवळी, योगीराज महाले, बद्रिप्रसाद वाबळे, बाळासाहेब वाजे यांनी प्रयत्न केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या