दह्याने उत्कृष्ट ग्रामपंचायत राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेत तालुक्यात दुसऱ्या स्थानी
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २०२१ ते ३० जुन २०२२ या कालावधीत महा आवास अभियान – ग्रामीण २.० राबविण्यात आलेले होते त्या अंतर्गत तालुक्यातील उत्कृष्ट घरकुल , उत्कृष्ट ग्रामपंचायत यांच्यासाठी पारितोषिके हि ठेवण्यात आलेली होती त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील पारितोषिक वितरण सोहळा पंचायत समिती चांदवड सभागृहात मा. आमदार महोदय यांच्या हस्ते पार पडला या सोहळ्यात तालुक्यातील उत्कृष्ट घरकुल व उत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच उत्कृष्ट क्लस्टर यांना पारितोषिके देण्यात आली

उत्कृष्ट घरकुल :- राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेत
यशोदाबाई लुखा निरसट- दह्याणे यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले आहे. तर
उत्कृष्ट ग्रामपंचायत राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेत
दह्याणे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.सरपंच सुवर्णाताई भवर, उपसरपंच सुनील भवर मा.उपसभापती सौ ज्योती विलास भवर, पंडित सोनवणे ,अनिल वाघ ,अशोक इंगळे, उमेश नागरे ,सुवर्णा भोई, रेणुका चौधरी ,जयश्री लव्हारे ग्रामसेवक ग्रामसेवक राहुल पगारे आदी उपस्थित होते.

