[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यातील ३५ ग्रामपचायतींच्या पारूप मतदार याद्या उद्या तहसील कार्यालय, संबधित तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध होणार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यातील ३५ ग्रामपचायतींच्या पारूप मतदार याद्या उद्या तहसील कार्यालय, संबधित तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध होणार

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे ऑक्टोबर 2022 ते माहे डिसेंबर 2022 पर्यंतच्या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या संगणक प्रणालीद्वारे मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यानुसार चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या संगणक प्रणाली आधारे मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत आहे .त्यानुसार गुरुवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी मतदार यादी संबंधित तहसील कार्यालय तलाठी कार्यालय व संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालयात प्रभाग निहाय पारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आडगाव ,बोराळे, भाटगाव ,भुत्याने चिंचोले, दहेगाव (मनमाड ) ,चिखलआंबे ,दरेगाव , देवरगाव ,दूधखेड ,दुगाव ,डोणगाव , गणुर,कोकणखेडे, कुंदलगाव , काजीसांगवी , खेलदरी ,विटावे , खडक ओझर – गुऱ्हाळे, मालसाने , मेसनखेडे बुद्रुक, निंबाळे निमोण ,नारायणगाव, पाटे कोलटेक ,पुरी, रेडगाव खुर्द ,साळसाने ,सोनीसांगवी, शेलू ,शिंगवे, तळेगावरोही ,तळवाडे ,वाद , वडाळभोई या ग्रामपंचायतच्या फारूक मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत सदर मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी चांदवड तहसील कार्यालयात गुरुवार दिनांक 13/ 10 /2022 ते मंगळवार दिनांक 18 /10 /2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. (तसेच शनिवार दिनांक 15 /10 /2022 रोजी सुध्दा हरकती स्वीकारण्यात येणार आहे ).प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी शुक्रवार दिनांक २१/१०/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. असे तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी चांदवड प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या