किसान दिनानिमित्त ‘एलोरा सीड्स’ तर्फे शेतकऱ्यांचा सन्मान
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने एलोरा नॅचरल सीड्स व मे जाधव आणि कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एलोराची निवड केली व भरघोस उत्पादन काढले. कृषीजन्य संस्कृतीचा एक मजबूत पाया आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी नेहमीच दुर्लक्षित झालेला दिसतो. अशा कृषिनिष्ठ संस्कृतीचा कार्यशील घटक म्हणून एलोरा कंपनीकडे बघितले जाते.
चांदवड येथील जाधव आणि कंपनी येथे शेतकरी प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दरसवाडी येथील प्रयोगशील शेतकरी आर. डी. थोरात साहेब, दिलीप बिडगर( उसवाड), बाळासाहेब आरीइंगळे (मंगरूळ) आदी शेतकऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी एलोरा कंपनीचे प्रतिनिधी शरद आमले, जाधव आणि कंपनीचे अरुणशेठ जाधव, किरण ठाकरे, समर्थ ठाकरे, आकाश पवार, रेवन जाधव, कमलेश पवार, दिपांशु जाधव, दीपक गांगुर्डे, गोकुळ जाधव, सारंग जाधव, धनंजय जाधव, पुष्पक गवळे, नवनाथ जाधव, विकास जाधव व शेतकरी बांधव उपस्थित होते


