चांदवड देवळा मतदार संघाचे भाग्यविधाते,विकास पुरुष लोकप्रिय आमदार डॉ राहुलदादा आहेर यांच्या वाढदिवसा निमित्त दह्याने येथे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ॲड.शांताराम भवर मित्र परिवार व दह्याने ग्रामस्थ यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार साहेब यांनी आपल्या वाढदिवसा निमित्ताने कोणतेही शुभेच्छा फलक,सत्कार यावर खर्च न करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याला अनुसरून इतर बाबीवर खर्च न करता ॲड.शांताराम भवर मित्र परिवाराने दह्याने येथे 250 विविध प्रकारचे फळ झाडे,औषधी झाडे,फुल झाडे खंडेराव महाराज मंदिर, ईश्वर बाबा महादेव मंदिर,स्मशानभूमी परिसरात लावण्याचा संकल्प केला व त्यानुसार आज विविध झाडे लावण्यात आली.

वृक्षारोपण साठी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ॲड.शांताराम भवर उपसरपंच सुनिल भवर,तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पगार,सोसायटी संचालक विनायक भवर,व्हा चेअरमन कमलेश लव्हारे,ग्रामपंचायत सदस्य अशोक हिंगले,राजाभाऊ भवर यांनी सहकार्य व नियोजन केले.
वृक्षारोपण साठी भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे,जेष्ठ नेते बाळासाहेब माळी, साहेबराव गवळी, सरचिटणीस गणेश महाले,गणपत ठाकरे,रोहन भोये,शांताराम कुंवर,भगवान पारधी,सुनिल गायकवाड, संजय गांगुर्डे,पिंपळणारे सरपंच निलेश आहेर,गणपत शिरसाठ तसेच दह्याने ग्रामस्थ अमोल भवर, विजय भवर,रावसाहेब भवर,सुरेश भवर, उमेश नागरे,लहाणू भवर,आनंदा खैरनार,मधुकर भवर,रतन भवर,शिवाजी पवार,गणेश भवर,मधुकर रहिरे, संतोष पवार,पंढरीनाथ भवर, अश्विन गायकवाड, सोमनाथ गांगुर्डे आदी उपस्थित होते.

