भाऊसाहेब व रूपाली देवरे यांच्या रूपाने दरेगावकरांचा गौरव या दापंत्याना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार जाहीर
चांदवड तालुक्यातील दरेगाव येथिल व सध्या व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेले युवा उद्योजक रुपाली व भाऊसाहेब देवरे यांना रिईसिल. इन या संस्थेतर्फे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. त्यांना नाशिक येथील रेडिसन ब्ल्यू या पंचतरांकित हॉटेलमध्ये शानदार सोहळ्यात 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .
भाऊसाहेब व रुपाली देवरे यांनी पुणे येथे सर्वेश इंटरप्राईजेस या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी पारंपारीक आयुर्वेदाला तंत्रज्ञानाची जोड देवून सर्वेश इंटरप्राईजेस या कंपनीने कांस्य थाळी विकसीत करून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. सर्वेश कांस्य थाळीला विविध राज्यांमध्ये प्रचंड मागणी आहे. गुजरात ,उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, कर्नाटक ,आंध्रप्रदेश ,हरीयाणा, पंजाब ,चंदीगड, छत्तीसगड यासह इतरही राज्यात युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून दिली. एक हजारापेक्षा जास्त ठिकाणी देशाच्या कानाकोप-यात यांचे सेंटर चालू आहे आरोग्याची विषेश काळजी कशी घ्यावी ,उद्योग कसा उभारावा.
याविषयीचे संपुर्ण ज्ञान देणारी हि कंपनी अगदी कमी कालावधीत नावारूपास आली आहे. आयुर्वेद हे त्रिकाल सत्यं आहे हा संदेश घराघरात पोहचवणारी कंपनीचे एम. डी. रुपाली देवरे यांनी” सांगितले की जोपर्यंत आजार आहे तोपर्यंत हा व्यवसाय बंद पडणार नाही भविष्यकाळात प्रत्येकाच्या घरात ही मशीन आपल्याला दिसणार आहे युके , इजराइल ,चीन , नेपाळ या देशांमध्ये सुद्धा या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे म्हणून कंपनीने नवीन पॉकेट मशीन देखील लॉन्च केले आहे.त्याचबरोबर बेरोजगार युवकांना इतरही लघुउद्योग उपलब्ध करून देण्यारी ही एक कंपनी आहे.

