[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड कु.ऊ.बा सभापती संजय जाधव यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर मांडल्या तालुक्यात झालेली गारपीट, बेमोसमी पाऊस व दुष्काळ या संदर्भातील व्यथा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड कु.ऊ.बा सभापती संजय जाधव यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर मांडल्या तालुक्यात झालेली गारपीट, बेमोसमी पाऊस व दुष्काळ या संदर्भातील व्यथा

सोमवारी मुंबई येथील काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री.नाना पटोले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, यावेळी होऊ घातलेल्या निवडणुकी विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले साहेब यांची चांदवड कुर्षी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी भेट घेऊन चांदवड तालुक्यात झालेली गारपीट, बेमोसमी पाऊस व दुष्काळ या संदर्भात माहिती दिली तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबाबतीमध्ये काय उपायोजना करता येतील यासाठी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून सूचना केल्या.
यावेळी राज्यातील सर्व तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.!
व यावेळेस राज्यातील सर्व तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या