चांदवडला काँग्रेस तर्फे स्व. इंदिरा गांधी जयंती साजरी
चांदवड ( प्रतिनिधी ) : – भारताच्या माजी पंतप्रधान स्व . इंदिरा गांधी यांच्या जंयती निमित्ताने चांदवड तालुका कांग्रेस पक्षातर्फे इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. यावेळी तालुका अध्यक्ष संजय जाधव,विजय कुंभार्डे ,मधुकर जाधव,राहुल जमदाडे,राजेंद्र केदारे व इतर नागरिक उपस्थित होते.


