वाटू नये वझं
ववाळीला माझा
आला भाऊराया
गोड दोन घास
घालीते गं खाया
इडापिडा नगं
देवा देऊ त्याला
सुखाचं रं दिसं
असू दे वाट्याला
चांगल्याचा संग
सुटू नगं देऊ
पाटी ती प्रेमाची
फुटू नगं देऊ
एवढं मागणं
ऐक देवा माझं
माय बाप त्याला
वाटू नये वझं
– प्रवीण सोमासे
येवला


