[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

विद्यार्थीनिने शेतकर्यांना विविध विषयांवर प्रात्यक्षिके करून दिली माहिती

यांनी लिहिलेले सचिन गाडे

प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांचे झाले प्रबोधन

शेतकर्यांना प्रात्यक्षिक दाखवताना कृषिकन्या कु गायत्री शिवाजी कासव

आहिरखेडे : चांदवड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी संलग्न मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटिल कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी उदयोग आधारित कार्यक्रम अंतर्गत कृषिकन्या गायत्री शिवाजी कासव या विद्यार्थीनिने शेतकर्यांना विविध विषयांवर प्रात्यक्षिके करून माहिती दिली.

मधमाशीपालन,माती परिक्षण,शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष,चारा प्रक्रिया,जनावरे आणि गोठा निर्जंतुकीकरण, बोर्डो मिश्रण,शेती उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञान याबाबत प्रात्यक्षिके करून माहिती दिली.

प्रबोधानात्मक मार्गदर्शन तसेच अडीअडचणी यांवर शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना विद्यार्थिनी गायत्री कासव

यावेळी प्रगतीशील शेतकरी बाजीराव आहेर, राजेंद्र आहेर,ज्ञानेश्वर आहेर, विनायक जामदार,शांताराम आहेर, नागेश आहेर,सुनिल आहेर,वाल्मिक कासव, रमण जामदार,अशोक कासव,सुनिल जामदार,गणेश गांगुर्डे,रवी जामदार,सुदशन चव्हाण,गोकुळ कासव,नाना सोनवणे,मनोहर माळी,उर्मिला आहेर, मनिषा जामदार, प्रमिला आहेर, कल्पना गांगुर्डे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मविप्र सरचिटणीस निलीमाताई पवार,शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस.पाटील,प्रा.डॉ.आय.बी.चव्हाण, प्रा.डॉ.डि.एस.शिंदे, प्रा.के.जे.पानसरे, प्रा.एस.बी.सातपुते, प्रा. एस.यु.सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा योग आला. विविध प्रात्यक्षिके देताना अनेक अडचणी येत असल्या तरी माझे मार्गदर्शक व म.वि. प्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, शिक्षणाधिकारी डॉ एन एस पाटील , प्रा डॉ आय बी चव्हाण, प्रा डॉ डी एस शिंदे, प्रा के जे पानसरे, प्रा एस बी सातपुते, प्रा एस. यु. सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत गेले. कृषिनिष्ठ संस्कृतीचा पाया असलेला अन मुख्य असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेता आले. – कृषीकन्या गायत्री शिवाजी कासव

लेखकाबद्दल

सचिन गाडे

एक टिप्पणी द्या