[masterslider id="2"]
राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नांदगाव येथे शिवसैनिकांचा रास्ता रोको

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

आमदार सुहास कांदे यांना आलेल्या धमकीच्या फोन निषेधार्थ नांदगाव येथे शिवसैनिकांचा रास्ता रोको …

 

नांदगाव / राजेंद्र तळेकर

आमदार सुहास कांदे यांना फोन करून धमकी दिल्याच्या घटनेवरून नांदगाव तालुका शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदवला,सोमवारी सायंकाळी अक्षय निकाळजे नामक व्यातीचा छोटा राजन यांचा पुतण्या असे सांगून फोन आला आणि भुजबळ यांच्या विरोधातील याचिका मागे घ्या अन्यथा आपणास व आपल्या कुटुंबासाठी ते योग्य होणार नाही अशी धमकी दिली,झालेला प्रकार आमदार सुहास कांदे यांनी पोलिस आयुक्त नाशिक यांना दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केला. ही घटना माहीत पडताच मनमाड, मालेगाव,येवला आणि आमदार कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघात सोशल मीडिया वर वाऱ्यासारखी पसरली.शिवसैनिक या प्रकाराने नाराज झाले. आज सकाळी 11 वाजे दरम्यान नांदगाव येथील हुतात्मा चौक येथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आणि सुहास कांदे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत एक तास भर रास्ता रोको आंदोलन केले,या प्रसंगी राजाभाऊ देशमुख , सुभाष नाना कुटे यांनी मनोगत व्यक्त करताना सदर घटनेची चौकशी करून लवकरात लवकर धमकी देणाऱ्यास अटक करण्यात यावी अशी मागणी केली.यानंतर नांदगाव चे पोलीस निरीक्षक कातकडे यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले
आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते , शिवसेना ता.प्रमुख किरण देवरे,नगराध्यक्ष राजेश कवडे,उप सभापती कृ.ऊ.बा.स.राजाभाऊ देशमुख, प.स.सभापती सुभाष कुटे,जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ जगताप,संतोष गुप्ता,शहर प्रमुख सुनील जाधव,ता.युवासेना प्रमुख सागर हिरे, युवासेना शहर प्रमुख मुज्जू शेख, मा.सभापती विलास आहेर,विष्णू निकम सर,प्रदीप कासलीवाल, अमोल नावंदर,विठ्ठल पगार,भैय्यासाहेब पगार,मनमाड मार्केट माजी सभापती किशोर लहाने, मार्केट संचालक बाळासाहेब कवडे, पुंजाराम जाधव, भाऊसाहेब सदगीर, वाल्मिक निकम भाउराव बागुल,जाहीर सौदागर,अंकुश कातकडे,गुलाब चव्हाण,किरण फुलारे,बापू जाधव,नितीन सोनवणे,मनीष बागोरे,आरिफ शेख,सद्दाम शेख,उपस्थित होते.

 

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या