[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नांदगाव विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहिर करा

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

नांदगाव विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहिर करा

नांदगाव /राजेंद्र तळेकर नांदगाव

नांदगाव विधान सभा मतदार संघ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा या करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री उद्धव ठाकरे साहेब,तथा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार साहेब यांना निवेदन देताना नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सुहास आण्णा कांदे
नांदगाव मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.हिरव्यागार पिकांची डोळ्यासमोर होत असलेली नासाडी पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.मुसळधार पावसामुळे पिकांसोबत जनावरांची गैरसोय होत आहे,शहर,गावांमध्ये अनेक दिवस पूरपरिस्थिती कायम आहे,अनेकांचा संसार उध्वस्त झाला आहे,सामान्य नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असलेला शेतकरी बांधव पावसापुढे हतबल झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे,त्यांना आधार देण्याची गरज आहे,यासाठी महाराष्ट्र शासनाने नांदगाव मतदारसंघ हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्वरित शासकीय सोपस्कार पर पाडून शेतकरयांना,सामान्य नागरिकांना,व्यावसायिकांना मदत द्यावी ही विनंती निवेदनात करण्यात आली.
निवेदनात पुढील प्रमाणे उल्लेख कण्यात आला आहे, महोदय, उपरोक्त विषयान्वये माझ्या मतदारसंघात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली कधी नव्हे ते तालुक्यात तीन वेळेस महापूर आला त्यामुळे सर्व जनतेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले नांदगाव शहरात पाणी आले त्यामुळे काहींचे घरे वाहून गेले तर काहींच्या दुकानात पाणी गेल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले जनावरेही वाहून गेली घरे पडली तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आधीच मेटकुटीस आलेला शेतकरी यामुळे पूर्णतः उद्ध्वस्त होऊन कर्जबाजारी झाला आहे. यातून शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणे करिता नांदगाव विधानसभा मतदारसंघ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा व तातडीने मदत जाहीर करावी ही आग्रहाची मागणी आ.कांदे यांनी केली आहे

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या