कर्ही येथे सहा वर्षाच्या मुलाचा बंधाऱ्यात पडुन मृत्यु
नांदगाव /राजेंद्र तळेकर
कर्ही येथील एक मुलगा खेळत खेळत बंधार्रया जवळ गेला आणि बंधाऱ्यात बुडाला तब्बल सहा तासाच्या प्रतीक्षेनंतर त्याला बाहेर काढण्यात आले
कर्ही येथील विहान अनील काकड हा सहा वर्षाचा मुलगा घराजवळच असलेल्या बंधाऱ्यात जवळ गेला दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास तो त्या पाण्यात पडला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात शोध मोहीम राबविण्यात आली मात्र सायंकाळपर्यंत तो मिळून येऊ शकत नसल्याने अखेर मालेगाव येथून जीवन रक्षक पथक मागविण्यात आले या पथकाच्या साह्याने शोध मोहीम सुरू झाली त्यातच पावसाने मदतकार्यात अडथळे आणले पण शोध मोहीम न थांबता सुरूच राहिली अखेर रात्री दहाच्या सुमारास त्याचा मृतदेह हाती लागला यावेळी सर्वजण शोकसागरात बुडाली होते

