[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नांदगाव येथे किराणा दुकानात चोरी

राजेंद्र तळेकर / नांदगाव

नांदगाव येथील एका किराणा दुकानात चोरट्यांनी काजू बदाम तूप यांची चोरी केल्याची घटना घडली असून यामुळे शहरात खळबळ माजली आहे या व्यापारी वर्गात कमालीची धास्ती पसरले आहे नांदगाव येथील चांदवड जळगाव राष्ट्रीय महामार्गा 753 लगत असलेल्या अमोल नावंदर यांच्या किराणा दुकानाचे रात्री शटर वाकवून चोरट्यांनी 20 किलो काजू 17000 रुपये, 25 किलो बदाम बावीस हजार रुपये, वीस लिटर तूप दहा हजार रुपये, पंधरा हजार रुपयांची चिल्लर नाणी चोरून नेली आहे यासह परिसरातून जाताना तीन दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली असून या चोरीच्या घटनेने नांदगाव तालुक्यात व्यापारी वर्गात मोठी खळबळ माजली आहे येथील व्यापारी अमोल नावंदर हे विद्यमान आमदार सुहास कांदे यांचे अतिशय जिवलग मित्र असल्याने पोलिसांपुढे या चोरीचे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या