राजेंद्र तळेकर नांदगाव
आज नांदगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली या त विजांचा कडकडाट त्यामुळे वीज पडून वडाळी येथील राजेंद्र रामभाऊ वाघ यांच्या बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली गेली पंधरा दिवसांपासून पाऊस येत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे त्यातच आज वडाळी परिसरात पावसाचे आगमन झाले यात

बैल ठार झाल्याने कुटुंबीयांनी फोडला हंबरडा
विजांचा कडकडात आणी पावसाचा गडगडाट यामुळे येथील शेतकरी राजेंद्र रामभाऊ वाघ यांच्या शेतात बांधलेल्या बैलावर वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली यामुळे या शेतकर्याचे 50 ते 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकरीवर्ग आधीच आसमानी संकटांनी हैराण झाला असताना आता या नैसर्गिक घटनांमुळे पशुधनाची मोठी हानी झाली असून शेतकरी वर्ग बैल ठार झाल्याने कुटुंबीयांनी यावेळी हंबरडा फोडला होता

