[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रेल्वे पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करावा अन्यथा रेल रोकोचा इशारा

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

राजेंद्र तळेकर / नांदगाव

भालूर परिसरातील दहा खेड्यांचा मनमाडकरांशी संपर्क तुटला असून रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिक अडचणीत सापडले आहे त्यामुळे आज माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली या गावातील ग्रामस्थांनी नांदगाव चे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी केली असून न केल्यास रेल रोकोचा इशारा दिला आहे
नांदगाव तालुक्यातील सटाणे , वंजारवाडी, करही, माळेगाव कर्यात ,नारायणगाव ,घाडगेवाडी, विजयवाडी ,मोहेगाव, एक वई, बेजगाव ,भालूर लोहशिंगवे, लक्ष्मीनगर, मांडवड, वडाळी ,सोयगाव, खिर्डी, भौरी ,मोरझर ,आदी नागरिकांना मनमाड येथे जाण्यासाठी गेट नंबर दोन वरून जावे लागते रेल्वेने येथे सबवे बनवल्याने या सबवेमध्ये कायमच पाणी असते यामुळे या भागातील सुमारे 25 हजार नागरिकांचा मनमाड व इतर भागाशी संपर्क तुटला असून रेल्वेचा पर्यायी मार्ग असला तरी त्या मार्गावरचा पूल पूर्व पाण्याने खचून गेला असल्याने या मार्गावर शेतीमाल वाहतूक करता येत नाही परिणामी या शहराशी व जिल्ह्याची या भालूर पंचायत समिती गाणा चा संपर्क तुटला असल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे यामुळेच आज माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नांदगाव चे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन सादर करीत या ठिकाणी उपस्थित असलेली येवल्याचे उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांच्यासमोर ही पर्यायी मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली यावेळी त्यांच्या समवेत नारायणगाव चे सरपंच देविदास उगले वंजरवाडी चे संतोष पवार शंकर गुंडगळ मांडवड चे विठ्ठल आहेर भैय्या आहेर सुबोध थेटे अशोक निकम सर्जेराव तेथे भालूर चे विठ्ठल आहेर यांच्यासहित वरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पर्यायी मार्ग तात्काळ सुरू न केल्यास रेल रोकोचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या