मांडवड ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन
ग्राम चैतन्य/ राजेंद्र तळेकर नांदगाव
नांदगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची अवस्था रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी झाली आहे नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामस्थांना तालुक्यात दळण वळण करणे कठीण झाले असल्याने ग्रामस्थानी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
तालुक्यात मागील महिन्यापासून सतत अतिवृष्टी होत असल्याने नांदगाव तालुक्यातील लेंडी व शाकंबरी या दोन्ही नद्यांना महापूर आला आणि त्या महापुरामुळे शेती व शेतपिकांचे व ग्रामीण भागातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले.
मांडवड गावातून शाकंबरी नदी वाहते आणि या नदीवरील तिनही फरशी पूल पाण्याखाली गेल्याने ते वाहून गेल्याने कोणतेही वाहन त्यावरून नांदगाव ला येत जात नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणे ,विद्यार्थी यांना शाळेत ये जा करणे तसेच गावातील रुग्ण रुग्णालयात देखील वेळेवर पोहचू शकत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मांडवड-लक्ष्मीनगर,मांडवड-महापुरुष बाबा,मांडवड -हिसवळ या तीनही फरशी पूल पाण्याखाली गेली .मांडवड,लक्ष्मीनगर,भालूर, लोहशिंगवे,आझादनगर आदी गावांच्या नागरिकांचे दळण वळणासाठी अतोनात हाल होत आहे तर शेतमाल शेतातच पडून असल्याने मोठी आर्थिक हानी होत आहे
मांडवड नांदगाव रोडवरील शहरालगत असलेला हाग्या नाल्याला वरील फरशी वाहून गेल्याने मांडवड ये जा करतांना अवघे ६की.चे अंतर वडाळी मोरझर दहेगावं मार्गे २२की मी असे अंतर पार करावे लागल्याने महाविद्याल व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सदर मांडवड नांदगाव रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करून शेतकरी,विद्यार्थी, आणि गावकऱ्यांना होणारी रस्त्याची अडचण दूर करावी तसेच
नांदगाव-मांडवड- लक्ष्मीनगर शाकंबरी नदीवरील तिन्ही फरशी पुलांची उंची वाढून मिळावी.
मांडवड दहेगावं रस्त्याची दुरुस्ती करणे.मांडवड मोरझर रस्ता दुरुस्ती करणे हद्दीच्या वादाने हाग्या नाल्याचे दुरुस्ती प्रलंबित होत असल्याने मांडवड,लक्ष्मीनगर,पिंजरवाडी, भालूर,लोहशिंगवे आदी गावांना मोठी कसरत तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा आशा अनेक मागण्या ग्रामस्थानी केल्या आहे.
या वेळी माजी आमदार संजय पवार मांडवड चे जेष्ठ नेते विठ्ठल आहेर,शिवबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष अशोक निकम,मांडवड चे सरपंच अंकुश डोळे, सुशील आंबेकर,सर्जेराव थेटे,नरहरी थेटे,दत्तात्रय निकम,ज्ञानेश्वर गावित,गणेश माळी, अंनतराज आहेर,बाबासाहेब आहेर,विजय आहेर, भगवान पाटील,भाऊसाहेब पाटील,विजय पाटील ,मॅचिंद्र जगताप,संतोष पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी ने मांडवड चे सर्व रस्ते अतिशय धोकेदायक झाले असून प्रशासनाला वेळो वेळी भेटून पत्रव्यवहार करून देखील या रस्त्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने शेतकरी,शालेय मूल, रुग्ण, आदींना मोठी अडचण सहन करावी लागत असून तालुकाच्या व गावचा संपर्क अनेक वेळा तुटला आहे.तरी प्रशशनने आमचा रस्ता दुरुस्ती करून मिळावी ही विनंती. जेष्ठ नेते विठ्ठल आहेर, मांडवड
………….………………………………………………………..
आमच्या गावच्या नदीवरील फरशी पूल तुटल्याने ग्रामस्थ व विध्यार्थ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.ते दुरुस्ती करण्याची विनंती मनमाड कार्यालयाशी केली परंतु अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नसून उडवा उडवीची उत्तर देत आहे. अशोक निकम शिवबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष-मांडवड

