‘चांदवडी रुपय्या’ पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा
चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ आयोजित गुणगौरव सोहळा रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सार्वजनिक वाचनालय चांदवड येथे आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष डॉ राजेंद्र मलोसे असून, प्रमुख पाहुणे जेष्ठ समीक्षक डॉ एकनाथ पगार व जेष्ट कवी, प्राचार्य लक्ष्मण महाडिक आहेत.
याप्रसंगी चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार युवा साहित्यिक प्रशांत भरवीरकर यांना तर सामाजिक प्रेरणा पुरस्कार धोडंबे येशील असलेल्या हिंदूहृदयसम्राट मित्र मंडळ या निसर्गप्रेमी ग्रुपला देण्यात येणार आहे.
‘चांदवडी रुपय्या’ आयोजित कविता लेखन स्पर्धेतील बाल गटात प्रथम क्रमांक श्रुती शिंदे, द्वितीय क्रमांक वैष्णवी माळी, तृतीय क्रमांक वैष्णवी पवार, उत्तेजनार्थ पारितोषिके दीक्षा गांगुर्डे व साई शिंदे या बालकांना तर खुल्या गटातील कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कवी प्रफुल्ल सोनवणे, द्वितीय क्रमांक सौ मनीषा शिंदे, तृतीय क्रमांक कु. रोशनी खैरनार, उत्तेजनार्थ पारितोषिक कु. साक्षी कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात गौरविण्यात येईल
बाल दिनाचे औचित्य साधून कवी रावसाहेब जाधव यांच्या त्रैभाषिक बालकविता संग्रह ‘गरगर मोळ्या’ चे प्रकाशन डॉ एकनाथ पगार व कवी लक्ष्मण महाडिक यांचे हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी दिली. तसेच कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी केले.

