शेतकऱ्यांना सेवेची गरज
शेतकऱ्यांसाठी एकत्रित सर्वांनीच झोकून देत काम करण्याची आवश्यकता
निसर्गाच्या असमतोलपनाची सर्वात जास्त झळ ही शेतकऱ्यांना बसते हे जगजाहीर आहे बरं हा असमतोलपणा एखाद्या वर्षाचा पुरता असता तर तो आनंदाने नक्कीच स्वीकारला असता पण हे दुष्टचक्र काही केल्याने थांबेना या निसर्गचक्राचे फक्त स्वरूप बदलले कधी अनावृष्टी, कधी अतिवृष्टी , कधी गारपीट, कधी अति तापमान, कधी अति थंडी, कधी चक्रीवादळ या वेगवेगळ्या प्रकारात येणारे दुष्टचक्र आजवर अनुभवयास आलेले आहे याचं सोबत कधी खत टंचाई, कधी बियाणे टंचाई , ऐन हंगामात पिकविलेल्या शेतमालाचा घसरले दर, वाढलेले मजूरीदर, दरडोई होणारी कमीक्षेत्रधारण या सर्व अनिष्ट बाबीचा सामना करत शेतकरी शेती करतात त्यामुळे या त्यांच्या वर्षानुवर्ष शेती व्यवसायातील येत असलेल्या अडचणी आता तरी समाजाने नीट लक्षात घेण्याची गरज आहे एकीकडे लाईटचा झगमगाट तर दुसरीकडे अंधार अशी ही सामाजिक विषमता पहावयास येत आहे
त्यामुळे या कडे डोळसपणे पाहून झडझाडोनी काम करणे गरजेचे आहे शासनाची जी जी शेतीसबंधीत यंत्रणा आहे त्यांनी खरोखर एक मोहीम स्वरूपात काम करण्याची जास्त गरज आहे आजचे युवक शेतकरी मोठ्या हिमतीने, आधुनिक तंत्रज्ञान राबवीत शेती करत आहे त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे संबंधिताचे कर्तव्यच समजणे गरजेचे आहे हे प्रत्येकाने विचारात घेणे आवश्यक आहे
एकीकडे अनेक विभाग म्हणतात आमच्याकडे तोकडी मनुष्यबळ आहे हे जरी वास्तव असले तरी आहे त्यांनी सातत्याने पूर्ण क्षमतेने काम करणे हे ही गरजेचे आहे शेतकऱ्यांबाबत अंतःकरणात कायम पुढे होऊन काम करण्याचा ध्यासच असला पाहिजे आपण स्वतः काम करत असलेल्या सरकारी कार्यालयात समन्वय ठेवून मी सर्वांच्या मदतीने निश्चितपणे चांगले काम करील अशी दैनंदिन कामाची रूपरेषा असली पाहिजे अनुषंगिक काय काम करणे हिताचे होईल याची चर्चा झाली पाहिजे ती चर्चा शेतकऱ्यांना माहीत झाली पाहिजे
ऍग्रोवन मध्ये काल एक बातमी वाचण्यात आली त्या बातमीचा अर्थ असा निघतो की वरिष्ठांनी जादा कामाचा भार खालच्या वर्गातील काम करणाऱ्याच्या माथी लावला असे त्यात म्हणने होते ते जरी सत्य ही असले तरी ते सहन करत काम करणे हाच ध्यास चांगला राहील आजच्या काळात तरुण युवकांची वाढलेली बेरोजगारी ही विचारात घेतली तर आपण नशीबवान आहोत समजण्यास हरकत नाही कारण बेरोजगारांचा युवकाच्या गराड्यात आपल्याला सेवेची संधी मिळाली त्यामुळे कष्ट जरी अधिक शेती , शेतकरी संदर्भात कामाविषयी करावी लागली तरी धन्यताच मानवी कारण शेतकरी सेवा निरहेतुक करायला मिळणे हे एक मोठे सत्कर्म आपल्या वाट्याला आले याचा आनंदच मानला पाहिजे ही बाब ही सत्य आहे की सर्वच झोकून काम करत नाहीत पण जे आपल्या वाट्याला काम आले ते इतरांकडे न पाहता आपण आपले काम करत राहिले पाहिजे इतरांनि काय करावे हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे पण शेतकरी सेवा मिळाल्यावर ती आनंदाने करावी हीच कर्मपूजा आपली ऐहिक जीवन फलद्रुप करणारी आहे
रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र औरंगाबाद

