[masterslider id="2"]
अध्यात्मिक कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज हेल्थ

चांदवडी रुपय्या युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन : ‘कथा – ललित – वैचारिकलेख’ साहित्याचा प्रकार

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

लेखकाचे वय ४० वर्षेपर्यंत ( दि. ३१ डिसेंबर पर्यंत ) असावे

चांदवडी रुपय्या युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन

१) साहित्याचा प्रकार ‘कथा – ललित – वैचारिकलेख’ ( मराठी भाषा )

२) आपली साहित्यकृती तीन वर्षे २०२२, २०२४, व २०२५ ( १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२५ ) या कलावधीत प्रकाशित झालेले असावे.

३) पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात.

४) लेखकाचे वय ४० वर्षेपर्यंत ( दि. ३१ डिसेंबर पर्यंत ) असावे

५) पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ११,०००/- ( अकरा हजार रुपये ), महावस्र, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे असेल.

६) साहित्यकृती पाठवताना सोबत पोस्टाचे पोहोच पत्र जोडावे. पुस्तक साध्या पोस्टाने पाठवावे. कुरियर करू नये.

७) आपल्या परिचय पत्रात : i) नाव ii) पत्ता व संपर्क क्रमांक iii) जन्म दिनांक iv) दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे वय v) प्रकाशन दिनांक (पुस्तकावर नमूद असलेली) vi) ISBN यांसह इतर या गोष्टी नमूद असाव्या. vii) यासोबतच शाळा सोडल्याचा दाखला किंवा pan कार्ड झेरोक्स यांपैकीच एक जन्मतारखेचा पुरावा स्वक्षांकित करून जोडावा viii) पुस्तकाबद्दल १०० ते १५० शब्दांत लेखकाची भूमिका (आशय) मांडावी

८) कोणतेही शुल्क नाही.

९) पुरस्कार तीन वर्षातून एकदा एका साहित्यप्रकाराला दिला जाईल. कादंबरी – कविता – कथा असे प्रत्येक कलाकृती प्रत्येक वर्षी एक सन्मानित केली जाईल. या वर्षी ‘कथा – ललित – वैचारिकलेख’ या साहित्य प्रकारची निवड केली जाईल

१०) दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत आपली साहित्यकृती खालील पत्यावर पाठवावी.

  • *सागर जाधव जोपुळकर*
  • चांदवडी रुपय्या,
  • मार्केट यार्ड, ता. चांदवड,
  • जि नाशिक ४२३१०१
  • 9404805068

– रावसाहेब जाधव        सागर जाधव जोपुळकर

व्हाटस ला मेसेज करण्यासाठी क्लिक करा

चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या