[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला अ. भा. महात्मा फुले समता परिषदेची शनिवारी महत्त्वाची बैठक समता सैनिकांनी उपस्थित राहण्याचे तालुकाअध्यक्ष यु.के.आहेर यांचे आवाहन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीपअण्णा खैरे यांच्या सूचनेनुसार समता परिषदेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या पूर्व विभागाचा तीन दिवसीय दौरा करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या समवेत उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष संतोष डोमे, नाशिक शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर उपस्थित राहणार आहे. चांदवड तालुक्यातील संघटन अधिक मजबूत होण्यासाठी, तसेच तालुक्यातील समता सैनिकांशी विचारविनिमय करण्यासाठी, संघटना अधिक व्यापक प्रमाणात कार्यरत राहण्यासाठी तालुक्यातील सर्व समता सैनिकांनी चांदवडला आढावा बैठकीसाठी शनिवारी ३० एप्रिल रोजी पाच वाजता गणुर रोडवरील शासकीय विश्रामगृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समता परिषदेचे चांदवड तालुका अध्यक्ष व चांदवड पंचायत समितीचे माजी उपसभापती यु.के.आहेर, परिषदेचे जिल्हा पदाधिकारी रघुनाथअण्णा आहेर, दुगाव सोसायटीचे चेअरमन सतिश सोनवणे, डॉ. अरूण निकम, सुनिलतात्या कबाडे,नंदकुमार मंडलिक, विजय जाधव व तालुक्यातील पदाधिकार्यांनी केले आहे.

समता परिषदेचा दौरा असा

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक पूर्व जिल्ह्याचा तीन दिवसीय दौरा दि.३० एप्रिल १ व २ मे २०२२ रोजी होणार आहे. दि.३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कळवण, दुपारी २ वाजता देवळा तर ५ वाजता चांदवड येथे आढावा बैठक होणार आहे. तर १ मे रोजी सकाळी १० वाजता त्र्यंबकेश्वर, दुपारी १ वाजता पेठ तर सायंकाळी ४ वाजता सुरगाणा येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तर दि.२ मे रोजी सकाळी १० वाजता सटाणा व ४ वाजता दिंडोरी येथे आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी यांनी दिली आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या