[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

संत जनार्दन स्वामी विद्यालय, गंगावे ता. चांदवड जि. नाशिक उज्वल यशाची परंपरा कायम एस.एस.सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

संत जनार्दन स्वामी विद्यालय, गंगावे ता. चांदवड जि. नाशिक उज्वल यशाची परंपरा कायम एस.एस.सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के

संत जनार्दन स्वामी विद्यालय गंगावे, ता. चांदवड जि. नाशिक, मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इ. दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:- कु.पायल साबळे प्रथम(90.40%) द्वितीय. कु. तनुजा गीते(90.20%) तृतीय. कु. काजल थोरमीसे (88. 00%) चतुर्थ कु. गीता गांगुर्डे (87.60%) चतुर्थ :-पंकज गांगुर्डे(87.60%) चतुर्थ:- तेजस कोल्हे(87.60%) पाचवा :- राहुल पवार=(87.00%).
कोरोना काळातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अभ्यास करून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात पालकांचाही सिंहाचा वाटा आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. सुनील भाऊ शेलार, सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. सोनवणे, पर्यवेक्षक आर जी जेजुरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले, व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या