दरेगाव येथील शेतकरी कुटुंबातील सचिन कौतिक जाधव या विद्यार्थ्यांने घरातील शेती सांभाळून व शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आपल्या जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करून हे यश संपादन केले आहे. त्याची फिलिपाईन्स या देशात येथे डी.एम.एस . एफ.या कॉलेजला एम.बी. बी. एस या शिक्षणासाठी निवड झाली आहे . घरातील कोन्हीही नोकरीला नसलेल्या शेतकरी कुटुंबातून परदेशी शिक्षणासाठी जाणारा सचिन हा गावातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. दरेगाव येथील कौतिक राजाराम जाधव यांचा चिरंजीव सचिनने पहिली ते दहावीपर्यंत डॉ.डी. एस .आहेर इंग्लिश मीडियम स्कूल विठेवाडी , ता – देवळा येथे शिक्षण घेतले .तसेच अकरावी व बारावी एस पी. डी. सुराणा चांदवड येथे शिक्षण पूर्ण केले .वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने व प्रचंड महत्वकांशा असल्याने जिद्दीच्या जोरावर सचिनने फिलिपाईन्स येथील डी. एम.एस एफ . कॉलेजला एम.बी.बि.एस.चे शिक्षण परदेशात घेण्याचे ठरवले. फिलिपाईन्स येथे 6 वर्षाचा अभ्यासक्रमासाठी शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी शिक्षणासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागते . पण त्यासाठी कुटुंबाची साथ मिळाल्याने सचिनच्या शिक्षणाच्या महत्त्वकांक्षा पूर्ण होत आहे. सचिनच्या पुढील वाटचालीत ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

