[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

यावल महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र संपन्न

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

यावल महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र संपन्न

प्रतिनिधी (यावल)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमाची उपयुक्तता तत्वे, निकष ह्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते.
चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरीश तळले, डॉ. हरीश नेमाडे (डी. एन महाविद्यालय फैजपूर) उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते प्रा. उदय जगताप (धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर) यांनी पी पी टी स्लाईडवर मार्गदर्शन करताना सांगितले की नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वांसाठी नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी रोजगाराच्या संधी व कौशल्ययुक्त शिक्षण नविन संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रा. जगताप म्हणाले की महाविद्यालयीन शिक्षण हे आज कौशल्य युक्त होणे काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्याने गुणवत्ता पूर्ण शिक्षण व अभ्यासक्रमाला सामोरे जाणे महत्त्वाचे ठरते कला, वाणिज्य व विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमाचा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. यात संशोधनाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. अभ्यासक्रमानुसार क्रेडिटला अनण्य महत्त्व देण्यात आले आहे, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्याना त्यांना उद्योगांमध्ये व्यावसायामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल ते स्वतःच भवितव्य स्वतः घडू शकतील असा शासनाचा प्रयत्न आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. असे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार यांनी केले. तर
आभार उपप्राचार्य प्रा. अर्जून पाटील यांनी मानले यावेळी चर्चासत्रात उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ सुधीर कापडे, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ प्रल्हाद पावरा, प्रा.मनोज पाटील, प्रा.संजिव कदम तासिका तत्त्वावरील प्राध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या