जंगली भाजीपाला आयुर्वेदिक महत्व..
आदिवासी भाग हा पुर्वीपासून डोंगरमाथ्यांनी सजलेल्या अशा निसर्गाच्या सानिध्यातील आदिवासी बाधवांना वनस्पती साम्राज्य सृष्टी बरोबरच जंगली रानभाजी हे निसर्गाने वरदानच दिले आहे. मुळात डोंगराळ भागात वारे वनराई मुळे ढग अडवले जातात त्यामुळे पाऊस लवकर होत असतो त्यामुळे या भागात रानभाज्यांची पर्वणी तयार होते कमी, अधिक प्रमाणात दरवर्षी पाऊस उशिरा का होईना पडत असतो. जंगलात वेगवेगळ्या रानभाज्या उगवतात . डोंगराळ भागात झाड, झुडपं धुंडाळून तर कुठे पडिक माळरानावर जाऊन आदिवासी बांधव रानभाज्या मिळवत असतात.रानभाज्या ह्या बिनखताच्या असल्याने बाजारातही जास्त मागणी असते. शरीरासाठी पौष्टिक आहार चवीला रूचकर आणि पचायला जड जात नाही त्यामुळे शहर वासियांना तर ह्या दिवसांत रानभाज्यांची भुरळच लागलेली असते. बाजारातील भाजी पाल्यांचे भाव वाढले असल्याने आदिवासी बांधव जंगलातील रानवाटा धुंडाळत राहतात.

१. दिघवढ ( दिहगढ)
दिघवढ ही कंदवेलवर्गीय रानभाजी मे महिन्यात झाडाझुडुपांमध्ये उगवते दिघवढीला मऊ काटे असतात कोवळा शेंडा तोडून भाजी करतात
२. शेवळा
कंदवर्गीय रानभाजी उन्हाळ्यात झुडुपांमध्ये उगवते काढून निसून घेतात आणि ताज्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात उडदाच्या डाळीत शीजवतात जास्त चरकट लागू नये म्हणून बोंडार झाडाचा कोवळा पाला टाकतात ती अतीशय रूचकर लागते फुलं कणीक मध्ये वापरतात
३.लुंढा
ही कंदवेलवर्गीय रानभाजी उन्हाळ्यात मे महिन्यात झाडाझुडुपांमध्ये उगवते दिघवढी सारखीच पण आकाराने जाड असते काटे नसतात कोवळा शेंडा तोडून भाजी करतात.
४. रानज्योत.
ही रानभाजी जूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर जंगलात उगवते अतिशय रूचकर लागते.
५. काहकाऱ्या.
काहकाऱ्या ही रानभाजी जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर जंगलात उगवते शेवळाप्रमानेच दिसते मोठी असते अतीशय रूचकर लागते.
६. रान तेरा
ही कंदवर्गीय रानभाजी जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर जंगलात उगवते पांनाचा आकार अळुप्रमाणे लहान असतो आदिवासी भागात उडिद कडधान्यांची पेरणीनंतर तेरा रानभाजीचा देव करतात नंतर आहारात सेवन करतात
७. आकऱ्या.
ही रानभाजी जुलैमध्ये जास्त पाऊस पडल्यानंतर डोंगराळ भागात जास्त प्रमाणात उगवते चवीला रूचकर लागते.
८.उळसा.
उळसा ही रानभाजी जुलै महिन्यात झाडाझुडुपांमध्ये, डोंगराळ भागात मोकळ्या जागेत उगवते ती अतीशय रूचकर लागते
९.रान वाघाट
रान वाघाट ही काटेरी वेलवर्गीय रानभाजी उन्हाळ्यात वाघाट वेलीला लिंबाच्या आकाराची फळं येतात कच्च्या फळांची साल काढून घेत बी फेकून देतात ती चवीला रूचकर लागते. ही वेल झाडाच्या पोकळीत किंवा दाट झुडपांमध्ये पांगलेली असते वेलीला वाघनख्या प्रमाणे काटे असतात म्हणून वाघाट म्हणतात
१०. करटूल
ही वेलवर्गीय रानभाजी जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर डोंगराळ भागात उगवते आकार कारलाप्रमाणे लहान असतो जुलै, ऑगस्ट महिन्यात वेलीला करटुल येतात त्याचे नर,मादी असे प्रकार आढळतात मादी वेलीला फुल व फळ येतात नर वेलीला फक्त फुलं येतात. आज काही भागात करटुलाची तयार नर्सरी आढळते.
११. पेंढर
ही काटेरी झाड वर्गीय रानभाजी जून महिन्यात पेंढरीच्या झाडाला काजूच्या आकाराची फळं येतात कोवळ्या फळांची भाजी करतात ही भाजी गरोदर महिलांना पौष्टिक आहार ठरते चवीला रूचकर लागते
१३. मोखा
मोखा हा वृक्ष तुरळक प्रमाणात डोंगराळ भागात आढळतो आदिवासी
भागात मे महिन्यात शरद ऋतूत मोख्खाला नवी पालवी फुटते त्याची भाजी बनवली जाते अतीशय रूचकर लागते.
१४.मोह टोंळबा.
मोहाचे झाड आदिवासींचे कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते. त्याचे वेगवेगळे फायदे आहेत .वाळलेल्या मोह फुलांची दारू गाळणे एप्रिल,मे, जून महिन्यात कच्या फळांची राळ धुऊन घेत साल काढून भाजी करतात परिपक्व झालेल्या कोळंबी पासून तेल गाळतात बाजारातील गोड तेलाच्या किंमती वाढल्या असल्याने आदिवासी बांधव मे, जून महिन्यात मोहाच्या झाडाखाली टोळंबी वेचतात मोह फळांच्या पीकलेल्या फळातील सालीचा गाभा गोड लागतो त्यामुळे रात्री वटवाघळे,हारोड, मोहट ( रानमांजर)हे पशू ,पक्षी झाडावर भ्रमंती करतात ती फळं तोडून घेत आंबा झाडावर नेऊन खातात आंबा झाडाखाली सकाळी मोह कोळंबी आढळते ती वेचून फोडून घेत आतील गाभा वाळवून तेल गाळतात पावसाळ्यात पाय नेहमीच ओले असल्याने बोटातील भागात जखम तयार होते मोहाचे तेल लावल्याने जखम भरून निघते व त्वचा कोरडी पडते .
१५. खरशींग
खरशींग हे झाड आदिवासी डोंगराळ भागात फारच कमी प्रमाणात आढळून येते नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा परिसर गुजरातच्या डांग परीसरात खरशींगाची झाडे आहेत या झाडाला ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेवग्या प्रेमाने शेंगा येतात परंतु त्या जाड आणि खरबाळ्या असतात त्याचे शेंगदाणे किंवा खुरसानी चटणी घालून भरीत बनवले जाते ते रूचकर लागते.खरशींग झाडांची सालीचा मुक्का मार बसलेल्या जागी अग्नीवर शेकुन चटका देतात दुःखने थांबते

१६. कोळू ,कांचन
कोळू ही रानभाजी पावसाळ्यात खीळवाड जमीनीत उगवते.
१७. भरडा
भरडा ही रानभाजी जुन महिन्यात उगवते चवीला रुचकर लागते
१८. झारझुरा
ही भाजी उन्हाळ्यात नदी, ओहळाच्या ठिकाणी पाण्याच्या गाळात वाढते पानांची भाजी बनवली जाते
१९. चाईचा मोहर
चाईचा मोहर ही रानभाजी पावसाळ्यात जून, जुलैमध्ये रानात आढळते धवळ्या मोहराची भाजी बनवली जाते.
२० कुहरूळा.
ही रानभाजी उन्हाळ्यात झाडाची पालवी पुर्ण गळून पडते कुहळाला नवी पालवी फुटते त्याची भाजी बनवली जाते.
२१. चारणी भाजी
चारणी भाजी ही पावसाळ्यात शेततळ्यातील बांधाच्या बुरूजावर किंवा मेंढाला उगवते जमिनीलगत वाढते पावसाळ्यात पानांची भाजी बनवली जाते.
२२. सरंबल
ही रानभाजी पावसाळ्यात जंगलात आढळते पावसाळ्यात गुराखी गुरे चारण्यासाठी रानात जातात तेव्हा रानातील,वाथरट, अळींब व सरंबल यांचे एकत्रित मिश्रण करून पळसाच्या कींवा सागच्या पानात अग्निच्या निखाऱ्यावर भाजतात त्याला पातोळी म्हणतात ती अतिशय रुचकर लागते
आदिवासी डोंगराळ भागातील रानभाज्या आहारातील वापरा बरोबरच आयुर्वेदिक महत्त्वही तीतकेच आहे.सुरगाणा,पेठ, त्र्यंबकेश्वर, डहाणू,पालघर,ठाणे, गुजरातचा डांग परिसरात रानभाज्या आढळतात.
श्री. सुभाष नारायण कामडी
( संशोधक)

