चांदवडला होणार नाना पटोलेंच्या उपस्थितीत कॉंग्रेसचा ‘शेतकरी संवाद मेळावा’
कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव यांच्या नेतृत्वात ‘शेतकरी संवाद मिळावा’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी चांदवड येथील राधाकृष्ण लोन्स येथे ‘शेतकरी संवाद मेळावा’चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समाधान जामदार, दिपांशु जाधव, कैलास कोतवाल, अक्षय माकुणे पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणूक जवळ आलेली असून, चांदवड देवळा मतदार संघाची जागा कॉंग्रेस पक्षाला मिळेल असा सर्वच राजकीय तज्ञांचा अंदाज आहे, या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळावे व शेती मातीच्या समस्यांचा आवाज जाणीवपूर्वक वरपर्यंत पोहोचावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खा. शोभा बच्छाव, खा. भास्कर भगरे सर, श्रीरामजी शेटे, सुधीर तांबे, शिरीषकुमार कोतवाल, राजाराम पाटील पानगव्हाणे, उत्तमबाबा भालेराव, नितीन ठाकरे, जयंत दिंडे, ब्रिजकिशोर दत्त, मदन जाधव यांच्या प्रमुख अतिथी म्हणून येणार असून महाविकास आघाडीचे नेते व शेतकरी उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेस कार्यकर्ते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत.

संजय दगुजी जाधव
सभापती कृषी उत्पन्न समिती चांदवड
चांदवडच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब उपस्थित राहणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना बळ मिळावे, महाविकास आघाडीचा ‘आमदार’ व्हावा. तसेच कृषी क्षेत्रातील समस्या शेतकऱ्यांकडून ऐकाव्या या हेतूने शेतकरी संवाद मेळावा आयोजित केला आहे. शेतकऱ्यांनी व तरुणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यानिमित्ताने करत आहोत.
— संजय दगुजी जाधव
सभापती कृषीउत्पन्न बाजार समिती चांदवड


