शिंगवे येथील मतोबा महाराज सोसायटीच्याचेअरमनपदी नाना गुंड व व्हा.चेअरमनपदी सौ संध्या माळवतकर यांची निवड.

चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील शिंगवे येथील मतोबा महाराज विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित शिंगवे या संस्थेची चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड चांदवड तालुका देखरेख सहकारी संस्थेच्या कार्यालयात झाली. त्यात चेअरमन म्हणून नाना बाबुराव गुंड यांची निवड झाली व व्हाईस चेअरमन म्हणून सौ संध्या राजेंद्र माळवतकर यांची निवड झाली. चेअरमन व व्हा चेअरमन निवडीसाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अध्याशी अधिकारी तथा सहकार अधिकारी नितीन पाटील यांनी यावेळी कामकाज पाहिले.त्यांना सहाय्य सचिव राजोळे यांनी केले.याप्रसंगी संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते संचालक मंडळामध्ये संचालक संजय चंदू खताळ, जगन्नाथ कारभारी खताळ, श्रावण फकीरा खताळ ,संजय सखाराम अहिरे तसेच संदीप गुंड अण्णा गुंड, लखन भिलोरे ,राजेंद्र माळवतकर असे असंख्य गावकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार केला.फोटो – शिंगेवे येथील मोतोबा महाराज सोसायटीचे चेअरमन नाना गुंड व व्हा चेअरमन संध्या माळवतकर यांचा सत्कार करताना डॉ. आत्माराम कुंभार्डे . समवेत संचालक मंडळ व ग्रामस्थ.

