चांदवड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परिपूर्ण राबविल्याबद्दल आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या वतीने रक्षाबंधन निमित्त साडी व सन्मानपत्र देऊन सन्मान

आज चांदवड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली योजना प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचविण्यासाठी तालुक्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी योजना परिपूर्ण राबविल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी चांदवड तालुक्यातील एकूण ७५७ अंगणवाडी सेविका, मदतनीस व अशा सेविका यांचा सन्मान सोहळा याप्रसंगी संपन्न झाला. यावेळी आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या वतीने रक्षाबंधन निमित्त साडी व सन्मानपत्र देण्यात आले तसेच यावेळी ही योजना राबविण्यात कश्या प्रकारे अनुभव आला हे ही आपल्या भाषणात आशा सेविकांना सांगितले.
यावेळी अनेक अश्या सेविकांनि आमदार आहेर यांना राख्या बांधल्या व आपली रक्षाबंधन साजरा केला.

शासनाने घोषित केलेली योजना ही फक्त कागदावर न राहता आज प्रत्येक बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाला आणि हे सर्व श्रेय फक्त आपल्या अंगणवाडी व आशा सेविकांनी केलेल्या कामाची पावती आहे स्वतःचे काम बाजूला ठेऊन रात्री अप रात्री त्यांनी अर्ज ऑनलाईन केले आहे. अनेक गावांमध्ये रेंज प्रॉब्लेम असून देखील अनेक सेविकांना आपले टार्गेट वेळेच्या आधी पूर्ण केल्याने आज रोजी तालुक्यातील बहिणींचे बँक खात्यात ३००० हजार रु. जमा झालेत. महिन्याभरात चांदवड तालुक्यातील आज पर्यंत एकूण ४९ हजार ९९५ अर्ज ऑनलाईन आले. स्वीकारले अर्ज मधून काल पर्यंत तालुक्यातील एकूण ३३ हजार महिलांना ३००० हजार रु बँक खात्यात जमा झाल्याने बहिणी आनंदी झाल्या आहेत त्यामुळे सरकारी योजना आज पोहोचली आहे यावेळी आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

याप्रसंगी गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, भाजप तालुका अध्यक्ष श्री. मनोज शिंदे, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, भाजप जेष्ठ नेते श्री.पंढरीनाथ खताळ, श्री.शांताराम भवर, श्री.संदीप काळे, श्री.सौरभ महाराज जाधव, श्री.मुकुंद बोरसे, श्री.योगेश ढोमसे, श्री.शशी बोरसे, श्री.राजेश गांगुर्डे, श्रीमती.गीताताई झालटे, सौ.कल्याणी कुलकर्णी, श्री.हनुमान वाळके, श्री.वर्धमान पांडे, श्री.मुकेश आहेर, श्री.बाजीराब वानखेडे, श्री.मिलिंद खरे, श्री.विजय धाकराव, श्री.महेश खंदारे तसेच तालुक्यातील अशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतीनीस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

