[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता

ग्रामीण शब्दविश्वाला उजाळा: ‘माती मागतेय पेनकिलर’ला भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार २०२५

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

पुरस्कार मानकरी:
१. नांगरमुठी – पांडुरंग पाटील (ग्रामीण कादंबरी, दर्या प्रकाशन, पुणे)
२. मोहरम – डॉ. हंसराज जाधव (ग्रामीण कथासंग्रह, लोकवाङ्गय गृह प्रकाशन, मुंबई)
३. पातीवरल्या बाया – सचिन शिंदे (ग्रामीण कविता संग्रह, अष्टगंध प्रकाशन, ठाणे) विभागून
४. माती मागतेय पेनकिलर – सागर जाधव जोपुळकर (ग्रामीण कविता संग्रह, अथर्व पब्लिकेशन्स, धुळे) विभागून
५. ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्गय: एक अभ्यास- डॉ. नारायण शिवशेट्टे (ग्रामीण समीक्षा, स्वरुप प्रकाशन, छ. संभाजीनगर) विभागून
६. जागरण – भारत सातपुते (ग्रामीण आत्मकथन, मांजरा प्रकाशन लातूर)

ग्रामीण शब्दविश्वाला उजाळा: ‘माती मागतेय पेनकिलर’ला भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार २०२५

ग्रामीण जाणिवांचा सशक्त हुंकार आपल्या कवितेतून मांडणाऱ्या कवी सागर जाधव-जोपुळकर यांच्या ‘माती मागतेय पेनकिलर’ या कवितासंग्रहाला भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सचिन शिंदे यांच्या ‘पातीवरल्या बाया’ या काव्यसंग्रहाला विभागून देण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे ग्रामीण साहित्याच्या प्रवाहात ‘माती मागतेय पेनकिलर’ व ‘पातीवरल्या बाया; या संग्रहाची चर्चा सुरु झाली आहे.

कोपरगाव, पोहेगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्ट गेली अनेक वर्षे ग्रामीण आशयावर सातत्याने काम करणाऱ्या साहित्यिकांना सन्मानित करत आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये ‘माती मागतेय पेनकिलर’ या संग्रहाचा ग्रामीण कविता या प्रकारात गौरव करण्यात आला आहे. या संग्रहाने यापूर्वीच विविध राज्यस्तरीय पुरस्कारांमधून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

कवी सागर जाधव-जोपुळकर यांच्या या संग्रहाने आधुनिक शेती आणि कृषी संस्कृतीचे भीषण वास्तव प्रभावीपणे अधोरेखित केले आहे. ज्येष्ठ समीक्षक पी. विठ्ठल यांनी या संग्रहाची पाठराखण करताना म्हटले आहे की, “हा संग्रह शेतीसंस्कृतीचे एक जिवंत-जागते वास्तव अधोरेखित करतो. यात एका संवेदनशील कवीमनाचा सूक्ष्म प्रक्षोभ आहे.”

कवी सागर जाधव जोपुळकर यांनी ग्रामीण जीवन, शेतजमिनी, शेतीव्यवस्था, गावकुसातील नाती आणि बदलत्या सामाजिक-आर्थिक वास्तवाचा आविष्कार आपल्या कवितेतून घडवला आहे. हा पुरस्कार ग्रामीण केंद्रित साहित्यप्रवाहाला अधिक मजबूत करणारा आणि नव्या पिढीच्या लेखकांना दिशा देणारा ठरला आहे.

पुरस्कारासाठी निवड करताना परीक्षकांनी विषयवैविध्य, भाषाशैली, ग्रामीण अनुभवाची प्रामाणिकता आणि कलात्मक मांडणी या निकषांना विशेष महत्त्व दिले. ‘माती मागतेय पेनकिलर’ या संग्रहातील कविता मातीशी जुळलेल्या कवीची आस्थेवाईक काव्यसंविता आहे.
या संग्रहातील कविता रासायनिक खतांच्या आणि विषारी कीटकनाशकांच्या अतिवापराने विषारी झालेल्या मातीची वेदना व्यक्त करतात. कवी विठ्ठलाला रोखठोक सवाल करतो, “तुझ्या पंढरीत विठू, पुन्हा कधी येऊ सांग, मातीमधल्या कोंबाचे, आहे फेडायचे पांग…” या ओळी मातीचे आर्तसूक्त आणि शेतकऱ्याच्या हलाखीच्या जीवनातील पांग फेडण्याची तळमळ दर्शवतात.

मानकरी कवी लेखकांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. ग्रामीण साहित्याला केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असलेला हा पुरस्कार उपक्रम, गावाकडच्या कवी लेखकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच मराठी वाङ्मयात ग्रामीण जाणिवांचा सशक्त प्रवाह जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे.

पुरस्कार मानकरी:
१. नांगरमुठी – पांडुरंग पाटील (ग्रामीण कादंबरी, दर्या प्रकाशन, पुणे)
२. मोहरम – डॉ. हंसराज जाधव (ग्रामीण कथासंग्रह, लोकवाङ्गय गृह प्रकाशन, मुंबई)
३. पातीवरल्या बाया – सचिन शिंदे (ग्रामीण कविता संग्रह, अष्टगंध प्रकाशन, ठाणे) विभागून
४. माती मागतेय पेनकिलर – सागर जाधव जोपुळकर (ग्रामीण कविता संग्रह, अथर्व पब्लिकेशन्स, धुळे) विभागून
५. ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्गय: एक अभ्यास- डॉ. नारायण शिवशेट्टे (ग्रामीण समीक्षा, स्वरुप प्रकाशन, छ. संभाजीनगर) विभागून
६. जागरण – भारत सातपुते (ग्रामीण आत्मकथन, मांजरा प्रकाशन लातूर)

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या