[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नाथ सेवेत आयुष्य समर्पित करणारे ढवळे बाबा वैकुंठवासी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

रंगपंचमी ला भरणारा कानिफनाथ यात्रोत्सव हा ढवळे बाबांचा आवडता उत्सव होता. या उत्सवात ते स्वतःला समर्पित करून घ्यायचे. दिवसभर रथासमोर उभे राहायचे, गेली चाळीस वर्षे त्यांनी कानिफनाथ मंदिरात दिवसरात्र सेवा केली.

नाथ सेवेत आयुष्य समर्पित करणारे ढवळे बाबा वैकुंठवासी

चांदवड तालुक्‍यातील नाथ संप्रदायातील महत्वाचे जागृत देवस्थान असणारे कानिफनाथ मंदिर दरेगाव हे विश्राम मढी म्हणून परिचित आहे. येथे अनेक भाविक दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी येत असतात. विशेषतः गुरुवारी परिसरातील नागरिकांची हजेरी असते. संप्रदायातीलतील भाविक भक्तांची विश्राम मढी ही विशेष पावन भूमी म्हणून परिचित आहे. या देवस्थानाची गेल्या 40 वर्षांपासून दिवस-रात्र सेवा करणारे ढवळे बाबा हे सुपरिचित व्यक्तिमत्त्व होते. कोणताही धार्मिक कार्यक्रम असो त्यात ढवळे बाबा अग्रेसर असायचे. आयुष्यभर त्यांनी आपले नाव कधी कोणाला कळू दिले नाही. एव्हाना ढवळे बाबा हेच नाव त्यांना आवडायचे. त्यामुळे सर्व शासकीय कागदपत्रात ढवळे बाबा या नावानेच त्यांची नोंद झालेली होती. दर वर्षी रंगपंचमी ला भरणारा कानिफनाथ यात्रोत्सव हा ढवळे बाबांचा आवडता उत्सव होता. या उत्सवात ते स्वतःला समर्पित करून घ्यायचे. दिवसभर रथासमोर उभे राहायचे, गेली चाळीस वर्षे त्यांनी कानिफनाथ मंदिरात दिवसरात्र सेवा केली. दररोज पहाटे ध्वनिक्षेपक लावून रसाळ भक्ती गीते ते ऐकवायचे. त्यानंतर आरती व्हायची ही परंपरा त्यांनी कधीही खंडित होऊ दिली नाही.

विशेष म्हणजे गुरुवारच्या शुभ दिवशी त्यांनी नित्याप्रमाणे पहाटे ध्वनि निक्षेप लावला होता व त्यानंतर ते अनंतात विलीन झाले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची आस्थेने विचारपूस करणार्‍या व्यक्तिमत्वाला दरेगावकर आता कायमचे मुकले आहे.

ढवळे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या